Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

म्हणून साजरा केला जातो ‘महाराष्ट्र कृषी दिन’; जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व आणि कारणे

57

महाराष्ट्रात दरवर्षी १ जुलै हा दिवस ‘महाराष्ट्र कृषी दिन Maharashtra Krushi Din’ म्हणून साजरा केला जातो.
कृषीप्रधान भारत म्हणून ओळखले जाणाऱ्या देशात कृषीसंस्कृतीचे स्मरण आणि शेतकरी कृतज्ञतेचा प्रतिक म्हणून या दिवसाला अत्यंत महत्त्व आहे. भारतीय आधुुनिक कृषी क्षेत्रात क्रांतिकारी योगदान असलेल्या आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कृषी तज्ज्ञ व पहिले शेतकरी मुख्यमंत्री, हरितक्रांतीचे जनक महानायक वसंतराव नाईक यांची जयंती ‘कृषी दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय सन १९८९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी घोषित केला होता. तेव्हापासून १ जुलैला शासकीय स्तरावर सर्वत्र हा दिवस ‘कृषी दिन’ म्हणून साजरा केला जातो.

काय आहे या मागचा इतिहास?

राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृतीदिनानिमित्त महाराष्ट्र कृषी दिन किंवा महाराष्ट्र कृषी दिवस साजरा केला जातो. वसंतराव नाईकांना महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनकही म्हटले जाते.

त्यांच्या जन्मदिवस हा महाराष्ट्र कृषी दिवस म्हणून साजरा केला जातो. वसंतराव फुलसिंग नाईक यांचा जन्म १ जुलै १९१३ रोजी झाला. १९६३ ते १९७५ या काळात ते राज्याचे मुख्यमंत्रीही होते. जेव्हा पासुन वसंत नाईक हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासुन त्यांनी कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी सदैव योगदान दिले असे सांगितले जाते.

(वाचा : मुंबई विद्यापीठाच्या १२ स्वायत्त महाविद्यालयांना अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा )

‘शेती आणि माती’वर निस्सीम भक्ती असणारे जागतिक ख्यातीचे कृषी तज्ञ व प्रगतशील शेतकरी अशीही त्यांची ओळख आहे. वसंतराव नाईक यांचे भारतीय राजकारण, लोकशाही सक्षमीकरण व विशेषतः कृषी औदयोगिक क्षेत्रातील क्रांतिकारी योगदानामुळे त्यांना ‘महानायक’ म्हणूनही आदराने संबोधले जाते.

शिवाय भारताचे राष्ट्रपती , भारतरत्न डॉ. प्रणव मुखर्जी यांनी “वसंतराव नाईक हे भारत मातेचे थोर सुपूत्र आहे.” या शब्दात नाईकांचे गौरव केले आहे. तसेच ‘थेट शेतकऱ्यांच्या बांधावर’ मोहिमेचे प्रवर्तक, विचारवंत एकनाथराव पवार यांनी ‘आधुनिक कृषीप्रधान भारताचे कृषीसंत’ या शब्दात महानायक वसंतराव नाईक यांचे वर्णन केले आहे.

म्हणून, भारतीय आधुुनिक कृषी क्षेत्रात क्रांतिकारी योगदान असलेल्या आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कृषी तज्ज्ञ व पहिले शेतकरी मुख्यमंत्री, हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांची जयंती ‘कृषी दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय सन १९८९ मध्ये घोषित केला गेला.

(वाचा : आयडॉलच्या प्रवेशासाठी मुदतवाढ; ३० जूनऐवजी आता १५ जुलैपर्यंत भरता येणार प्रवेश अर्ज )

थोडक्यात पण विशेष :

भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. महाराष्ट्राला देशातील प्रमुख उत्पादक राज्य म्हणून ओळखले जाते. कृषी दिवस हा नैसर्गिकरित्याच पेरणीच्या मुहूर्तावरील एक पावनपर्व आहे. महानायक वसंतराव नाईक यांनी हरितक्रांती व श्वेतक्रांती घडवून आणली. याशिवाय पंचायत राज व रोजगार हमी योजनाचे देखील वसंतराव नाईक हे शिल्पकार मानले जातात. ते ‘पहिले शेतकरी मुख्यमंत्री व शेतकऱ्यांचा राजा’ म्हणूनही त्यांची ओळख आहे.

वसंतरावांनी,भूमिहिनांना लाखो एकर जमीन त्यांनी वाटप केली. शेतकऱ्यांच्या जीवनात स्वाभिमान आणि समृद्धी फुलवीण्याचे तसेच कृषीसंस्कृतीला नवसंजीवनी देण्याचे ऐतिहासिक कार्य महानायक वसंतराव नाईक यांनी केले. शिवाय, पहिल्यांदाच चार कृषी विदयापिठाची स्थापनाही त्यांनी केली.

१९७२ सारख्या भीषण दुष्काळातही महानायक वसंतराव नाईक यांच्या कारकिर्दीत कधी ‘शेतकरी आत्महत्या’ हा शब्द देखील गवसला नव्हता. शेतकऱ्यांवर त्यांचे जिवापाड प्रेम होते. शेती आणि मातीवरील त्यांची निस्सीम भक्ती ही भारतीय कृषीसंस्कृतीच्या इतिहासात एक प्रेरणा म्हणून ओळखली जाते.

(वाचा : Foreign Education: परदेशी शिक्षणाचे पर्याय अनेक; तुमचा परदेशी शिक्षणाचा मार्ग निवडण्यासाठी परिपूर्ण माहिती )

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.