Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

एकदम स्लिम, कमी वजनाचे स्मार्टफोन कोणते? Motorola, Vivo, Apple चे आहे हलके-फुलके फोन्स

11

​Motorola Edge 40 (किंमत: ३९,९९९ रुपये)

या यादीतील पहिला स्मार्टफोन म्हणजे Motorola Edge 40. हा स्मार्टफोन 2023 मध्ये लाँच झालेला सर्वात स्लिम आणि हलका फोन आहे. डिझाईन आणि बिल्डबद्दल बोलायचं झालं तर, हा फ्लॅगशिप-लेव्हल बिल्डसह येते आणि त्यात मेटल फ्रेम, लेदर बॅक आणि कर्व्ह डिस्प्ले आहे. हँडसेटची जाडी ही 7.6mm आणि वजन १६७ ग्रॅम आहे. हा फोन iPhone 14 Pro Max पेक्षा ७३ ग्रॅम हलका आहे.
तसंच हा स्मार्टफोन 144 Hz OLED डिस्प्ले, MediaTek Dimensity 8020 प्रोसेसरसह येतो. हँडसेटमध्ये ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा ही आहे.

Vivo V27 Pro (किंमत ३७,९९९ रुपये)

Vivo V27 Pro (किंमत ३७,९९९ रुपये)

Vivo V27 Pro हा देखील या यादीतील असा स्मार्टफोन आहे जो लूकमध्ये भारी असून सोबतच उत्कृष्ट फीचर्ससह येतो. हा फोन अगदी स्लिम आणि हलक्या डिझाइनसह येतो. विवोच्या या हँडसेटमध्ये कलर चेंजिंग बॅक पॅनल देण्यात आलं आहे. स्मार्टफोनमध्ये प्लास्टिक फ्रेमचा वापर देखील करण्यात आला आहे. Vivo V27 Pro ची जाडी 7.4mm आणि वजन १८२ ग्रॅम आहे. स्मार्टफोनमध्ये फ्लॅगशिप लेव्हल कॅमेरा दिला आहे. प्रो मॉडेलमध्ये फ्लॅगशिप डायमेन्सिटी 8200 चिपसेट देण्यात आला आहे. तसंच डायमेंसिटी 7200 चिपसेट नॉन-प्रो प्रकारात उपलब्ध आहे.

​iPhone 13 Mini (किंमत- ६४,९०० रुपये)

​iPhone 13 Mini (किंमत- ६४,९०० रुपये)

सर्वात आघाडीची स्मार्टफोन ब्रँड कंपनी Apple चा iPhone 13 Mini स्मार्टफोनमध्ये या लिस्टमध्ये आहे. याची स्क्रिन ५.४ इंच आहे. आयफोनचा हा मिनी व्हेरिएंट १४० ग्रॅमचा आहे. खिशात ठेवल्यानंतर तुम्हाला हा अगदी हलका वाटेल. पण कॉम्पॅक्ट असल्याने, फोनला 2438mAh ची छोटी बॅटरी मिळते. हेच कारण आहे की आयफोन 13 मिनी अगदी आणि कॉम्पॅक्ट फोन म्हणून ओळखला जातो.

वाचा : Google Maps : ड्रायव्हिंग करताना गुगल मॅप वापरता? ‘हे’ पाच फीचर्स वापरा, पैसे आणि वेळ दोन्ही वाचेल

Xiaomi 11 Lite 5G NE (किंमत-२२,९९९ रुपये)

Xiaomi 11 Lite 5G NE (किंमत-२२,९९९ रुपये)

शाओमीचा Xiaomi 11 Lite 5G NE हा फोन या यादीत आहे. हा फोन २०२१ मध्ये लाँच झाला आहे. पण हलक्या वजनामुळे तो या २०२३ च्या यादीत देखील आहे. या हँडसेटची जाडी 6.8mm आहे आणि याचे वजन फक्त १५८ ग्रॅम आहे. ६.५५ इंच डिस्प्ले असूनही, हा फोन या यादीतील सर्वात हलका आणि पातळ फोन आहे. Xiaomi 11 Lite 5G NE मध्ये स्नॅपड्रॅगन 778G 5G चिपसेट देण्यात आला आहे, ज्यामुळे फोनला मजबूत परफॉर्मन्स मिळतो.

​वाचा : Upcoming Smartphones : नवा फोन घ्यायचा विचार करताय? थांबा, भारतात लाँच होत आहेत दमदार स्मार्टफोन्स

​Oppo Reno 10 (संभाव्य किंमत ३० हजार)

​Oppo Reno 10 (संभाव्य किंमत ३० हजार)

Oppo Reno 10 अजून लाँच झालेला नाही पण याची डायमेंशन 7.6mm आहे, हे समोर आलं आहे. तसंच या स्मार्टफोनचं वजनही १८० ग्रॅमपर्यंत असू शकतं. जर तुम्हाला या यादीमध्ये समाविष्ट केलेला कोणताही फोन आवडत नसेल तर तुम्ही आगामी Reno 10 बद्दल विचार करू शकता. फोनच्या मागील पॅनलवर आणि समोर ग्लास देण्यात आलं आहे. Vivo V27 Pro प्रमाणे या हँडसेटमध्ये ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा उपलब्ध असेल.
​वाचा : BSNL चा एक वर्षाचा रिचार्ज अगदी स्वस्तात, महिन्याला खर्च करा फक्त १२६ रुपये, दररोज मिळेल 2GB डेटा​

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.