Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

दहावी पास उमेदवारांसाठी एमटीएसकडून नोकरीची संधी; तब्बल १५५८ जागांसाठी मोठी भरती

12

स्टाफ सिलेक्शन कमिशनने विविध पदांसाठी तब्बल १५५८ रिक्त जागांच्या भरतीची घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर याबद्दलची घोषणा करण्यात आली होती. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना २१ जुलै २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुभा आहे.

या भरतीमध्ये MTS (एमटीएस : मल्टी टास्किंग स्टाफ) आणि हवालदार या पदांचा समावेश आहे. सदर जागांच्या आणि त्या संबंधित पदभरतीसाठी इच्छुक उमेदवार दहावी उत्तीर्ण झालेला असावा. सरकारच्या सातवा वेतन आयोगानुसार उमेदवाराला पगार दिला जाणार आहे.

उपलब्ध पदांविषयी:
० मल्टी टास्किंग स्टाफ (टेक्निकल) – १ हजार १९८ जागा
० हवालदार (सीआयबीसी आणि सीबीएन) – ३६० जागा

(वाचा : IBPS Recruitment: आयबीपीएसकडून लिपिक पदांसाठी मोठ्या भरतीची घोषणा; अर्ज प्रक्रियेला आजपासून सुरुवात)

तब्बल १ हजार ५५८ जागांसाठीची हि महाभरती असून, यासाठी उमेदवाराचे वय १ ऑगस्ट २०२३ रोजी १८ ते २९ वर्षांपर्यत अनिवार्य असून आवश्यक आहे. राखीव आणि आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना आरक्षणाच्या नियमांनुसार वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

एससी आणि एसटी वर्गातील उमेदवारांना ५ वर्ष तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवार ३ वर्षांची सूट देण्यात आली आहे. सादर प्रवेश प्रक्रियेसाठी उमेदवारांना १०० तुपाये अर्ज शुल्क भरावे लागणार असून, महिला, अनुसूचित जाती, एससी, एसटी, अपंग व्यक्ती आणि माजी सिनिकन कोणत्ययी प्रकारचे प्रवेश अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

वरील पदभरतीसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया संगणकीय आणि शारीरिक क्षमता चाचणीवर आधारित असणार असून, याद्वारे पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे. विशेष म्हणजे भारतभरातील सर्व उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहेत.

(वाचा : दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; मुंबईत, महाराष्ट्र अग्निशमन दलात प्रशिक्षण आणि नोकरीची संधी)

अर्जाची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असून २१ जुलैपर्यंत इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज भरात येणार आहे. दिलेल्या अंतिम तारखेनंतर अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज नाकारले जातील. शिवाय, कोणत्याही क्षणी किंवा पडताळणीच्या कोणत्याही पायरीवर उमेदवाराची माहिती खोटी आढळ्यास सादर उमेदवाराच्या अर्जाचा विचार केला जाणार नसल्याचे एमटीएसकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

असा करा अर्ज :

० सदर पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराने https://ssc.nic.in ला भेट द्या.
० अधिक माहितीसाठी आणि अर्जाविषयीच्या नियमांसाठी वेबसाईटवरील Annexure III आणि Annexure IV वाचा.

० ऑनलाइन रजिस्ट्रेशसाठीची आवश्यक माहिती Annexure IIIA आणि Annexure IVA सविस्तर देण्यात आली आहे.
० हे रजिस्ट्रेशन ONE TIME REGISTRATION असणार आहे.
० अर्ज भरण्यापूर्वी Registration Form आणि Application Form काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

० मोबाईल नंबर, ई-मेल आयडी आणि आधार नंबर वापरून रजिस्ट्रेशन पूर्ण करा.
० आधार कार्ड उपलब्ध नसल्यास पॅन कार्ड, पासपोर्ट, एम्प्लॉयर आयडी, मतदार ओळखपत्र वापरण्याची मुभा आहे.

(वाचा : भारतातील पहिले एआय विद्यापीठ सज्ज; मुंबईमध्ये तयार आहे देशातील पहिलीवहिली AI University)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.