Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
लिटिगेशन अॅडव्होकेट (Litigation Advocate)
कायद्याचा सराव केल्यानंतर, तुम्ही लिटिगेशन अॅडव्होकेट (वकील) म्हणून काम करू शकता. हे वकील त्यांच्या अशिलाच्या कोणत्याही वादाशी संबंधित केस कोर्टात दाखल करतात. शिवाय, आपल्या अशिलाच्या बाजूने कोर्टातील कामकाजांची आन कागदपत्रांची पूर्तता करण्याची महत्त्वाची जबाबदारी यांच्यावर असते. लिटिगेशन अंतर्गत, तुम्ही सिव्हिल लॉ किंवा क्रिमिनल लॉ मध्ये स्पेशलायझेशन निवडू शकता. दिवाणी खटल्यांमध्ये व्यक्ती, संस्था किंवा सरकारी संस्था यांच्यातील विवादांचा समावेश असतो, याअंतर्गत तुम्हाला फौजदारी खटले किंवा विविध गुन्ह्यांशी संबंधित केसवर काम करता येते.
(वाचा : Engineering Degree: या संस्थांमध्ये मिळेल जेईईच्या मार्कांविना इंजिनिअरिंग आणि संबंधित अभ्यासक्रमांना प्रवेश)
कॉर्पोरेट अॅडव्होकेट (Corporate Advocate)
वकिलीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्ही कॉर्पोरेट लॉ क्षेत्रात करिअर करू शकता. हे वकील कॉर्पोरेट कायद्यात पारंगत असतात. संस्थांमधील करार आणि इतर कायदेशीर कागदपत्रांचा मसुदा तयार करण्यासाठी आणि पुनरावलोकन करण्यासाठी हे वकील जबाबदार असतात. ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि कायदेशीर आवश्यकतांचे पालन करण्यासाठी आणि सुनिश्चितकरण्याची जबाबदारी यांच्यावर असते. सोबतच, कॉर्पोरेट गव्हर्नन्स मानकांचे पालन सुनिश्चित करणे आणि संस्थेशी निगडित कायदेशीर कामांचा आढावा घेऊन ते पूर्णत्वास नेण्यात हे महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. देशातील जवळपास प्रत्येक कंपनीकडून कायदेशीर वकिलांची नियुक्ती केली जाते.अशा वकिलांनाही लाखो रुपयात पगार मिळतो.
कायदे सल्लागार (Legal Advisor/Legal Consultant)
कायद्याचा सराव केल्यानंतर उमेदवार कायदे सल्लागार म्हणून काम करुस शकतात. असे वकील व्यक्ती, व्यवसाय किंवा सरकारी संस्थांसाठी विशेष कायदेशीर सल्लागार म्हणून काम करतात . कायदेशीर सल्लागार म्हणून, तुम्ही तुमच्या कौशल्याचा वापर ग्राहकांना विविध कायदेशीर बाबींवर मार्गदर्शन करण्यासाठी करू शकता. विविध करार, नियामक अनुपालन, रोजगार कायदा या आणि अशा अनेक बाबींचा यात समावेश होतो. कायदेशीर सल्लागार सहसा विविध प्रकारच्या क्लायंटसोबत काम करतात; ज्यात लहान व्यवसाय, स्टार्टअप्स, बहुराष्ट्रीय कॉर्पोरेशन, सरकारी एजन्सी किंवा वैयक्तिक क्लायंटचा समावेश असतो.
(वाचा : भारतातील पहिले एआय विद्यापीठ सज्ज; मुंबईमध्ये तयार आहे देशातील पहिलीवहिली AI University)
इन हाउस एडवाइजर (In House Advisor)
वकिलीनंतर तुम्ही इन-हाऊस सल्लागार बनूनही करिअर करू शकता. असे वकील कंपनीमध्ये काम करतात आणि कंपनीला विविध अडचणींवर कायदेशीर सल्ला देतात. हे काम करताना संबंधित संस्थेच्या दैनंदिन कायदेशीर बाबींमध्ये लक्ष घालून त्यावर काम करण्याचीही गरज पडते. इन हाउस एडवाइजर म्हणून काम करताना तुम्हाला करार, रोजगार कायदा, नियामक अनुपालन, खटला यासह कायद्याच्या विविध क्षेत्रांची विस्तृत माहिती असणे अत्यावश्यक असते.
एडीआर स्पेशालिस्ट (Alternative Dispute Resolution (ADR) Specialist)
वकिली केलेले तरुण एडीआर स्पेशालिस्ट म्हणूनही करिअर निवडू शकतात. असे वकील त्यांच्यामार्फत वाद सोडवण्याची सोय करतात. म्हणजेच हे वकील मध्यस्थ म्हणून काम करतात आणि परस्परविरोधी पक्षांना मध्यस्थी करतात. ऐकण्याची क्षमता, प्रभावी संवाद, वाटाघाटी आणि समस्या सोडवणे यासह मजबूत संघर्ष आणि अडचणींचे निराकरण करण्याचे कौशल्ये असणे आवश्यक असते. कारण ही कौशल्ये त्यांना वादाच्यावेळी मध्यस्थी करण्यास मदत करतात.
(वाचा : Central Bank of India Recruitment: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये १००० रिक्त पदं; थेट मॅनेजर पदावर काम करण्याची संधी)
लीगल रिसर्चर (Legal Researcher)
वकिलीचा अभ्यासक्रम पूर्ण झल्यानंतर तुम्ही लीगल रिसर्चर म्हणूनही स्वतःचे करिअर घडवू शकता. असे वकील कायदेशीर बाबी किंवा धोरण तयार करण्यासाठी कोणत्याही समस्यांचे संशोधन आणि विश्लेषण करतात. संबंधित माहिती काढण्यासाठी आणि अर्थपूर्ण निष्कर्ष काढण्यासाठी त्यांना विविध कायदे, नियम आणि कायदेशीर भाष्य देखील तपासावे लागेल. कायदेशीर संशोधकांकडे अचूक आणि अद्ययावत माहिती गोळा करण्यासाठी कायदेशीर डेटाबेस, लायब्ररी आणि ऑनलाइन संसाधने वापरण्यात प्रवीणता, यासह उत्कृष्ट संशोधन कौशल्ये असणे आवश्यक आहे.
आयपी लॉयर (Intellectual Property (IP) Lawyer)
कायद्याचा सराव केल्यानंतर तुम्ही आयपी लॉयर म्हणूनही करिअर करू शकता. अशा वकिलांना पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराइट आणि व्यापारविषयक बाबींमध्ये पारंगत असावे लागते. या क्षेत्रात काम करताना नवनवीन कंपन्या, कलाकार, शोधक आणि निर्माते यांच्यासोबत काम करण्याची संधीही मिळते.