Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

रात्रभर फोन वापरत बसता, झोप लागत नाही? तुमच्या स्मार्टफोनमध्ये आजच बदला या सेटिंग्स

15

काही Android Setting येतील खूपच कामी

आपल्यापैकी बरेचजण रात्री फोन बाजूला ठेवतात आणि झोपायला जातात. पण कधी मेसेज, कॉल आणि नोटिफिकेशन या सर्वांमुळे फोन व्हायब्रेट होतच असतो. यामुळे युजर्स फोन उचलतात आणि पुन्हा वापरायला लागतात. ही समस्या खूप सामान्य आहे आणि यापासून सुटका मिळवण्यासाठी आम्ही तुम्हाला Android फोनच्या काही सेटिंग्ज सांगत आहोत ज्या तुम्ही लगेच कराव्यात.

नाईट लाईट ऑन करा

नाईट लाईट ऑन करा

फोनची लाईट खूप वेळ डोळ्यांवर पडल्यास ती हानिकारक ठरु शकते. ही लाईटही निद्रानाशाचे म्हणजेच झोप न लागण्याचे प्रमुख कारण ठरु शकते. तर ही समस्या दूर करण्यासाठी अँड्रॉइड 7 मध्ये नाईट लाइट फीचर आणण्यात आले होते, जे निळा प्रकाश कमी करते. हा प्रकाश कमी झाल्यावर फोन वापरूनही झोप येण्याची शक्यता असते. हे फीचर चालू करण्यासाठी तुम्हाला सेटिंगमध्ये जावे लागेल. नंतर डिस्प्ले आणि ब्राइटनेस वर टॅप करा. नंतर नाईट लाइट वर जा आणि रीडिंग मोड चालू करा.

​YouTube झोपण्याच्या वेळेचे रिमाइंडर सेट करा

​YouTube झोपण्याच्या वेळेचे रिमाइंडर सेट करा

जर तुम्ही यूट्यूब वापरत असताना वेळेचा मागोवा ठेवला नाही, तर तुम्हाला त्याचे झोपण्याच्या वेळेचे रिमाइंडर सेट करावे लागेल. हे तुम्हाला YouTube कधी बंद करायचे आणि झोपायला जायचे हे सांगेल. यासाठी सेटिंगमध्ये जा आणि त्यानंतर जनरल वर टॅप करा. यानंतर, झोपण्याची वेळ झाल्यावर Remember Me करा हे टॉगल चालू करा. येथून तुम्ही तुमची झोपण्याची वेळ सेट करू शकता.

​वाचा : Smartphone tips : तुमचा नवीन फोन बनावट तर नाही ना? खरेदी करण्यापूर्वी ‘या’ ५ गोष्टी नक्की चेक करा

​डिजिटल वेलबीइंगचा बेडटाइम मोड सुरू करा

​डिजिटल वेलबीइंगचा बेडटाइम मोड सुरू करा

डिजिटल वेलबीइंग हे स्क्रीन टाईम कमी करण्यात मदत करण्यासाठी डिझाइन केलेले साधन आहे. यामध्ये बेडटाइम मोड देण्यात आला आहे. हे वैशिष्ट्य कॉल आणि नोटिफिकेशन आपोआप डू नॉट डिस्टर्ब चालू करते. तसेच स्क्रीन काळ्या आणि पांढऱ्या रंगात करते. यासाठी तुम्हाला सेटिंगमध्ये जावे लागेल. त्यानंतर डिजिटल वेलबीइंग आणि पॅरेंटल कंट्रोलवर जाऊन बेडटाइम मोड सुरू करावा लागेल.

वाचा : Fire Boltt Gladiator : लूकमध्ये अगदी Apple Watch Ultra प्रमाणे जबरदस्त, किंमत फक्त २,४९९ रुपये​

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.