Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Realme चा लेटेस्ट स्मार्टफोन,108MP चा कॅमेरा लुकही अगदी जबरदस्त, १९ जुलैला होणार लाँच

9

नवी दिल्ली : Realme कंपनी आणखी एक नवीन 108MP कॅमेरा असणारा स्मार्टफोन Realme C53 लाँच करणार असल्याचं समोर आलं आहे. हा फोन १९ जुलै २०२३ रोजी दुपारी १२ वाजता लाँच होईल. फोनमध्ये ६.७ इंचाचा IPS LCD डिस्प्ले, 90Hz रिफ्रेश रेट, 5000mAh बॅटरी, 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट, 6GB RAM, 128GB स्टोरेज असे खास फीचर्स असणार असंही समोर येत आहे.

Realme नवीन स्मार्टफोन या महिन्यात लाँच करत आहे. Realme Narzo 60 मालिका अलीकडेच Realme ने लाँच केली आहे. तसेच, कंपनीने काही दिवसांपूर्वी Realme 11 सीरीज देखील लाँच केली होती. यात 100MP आणि 200MP चा कॅमेरा सेन्सर देण्यात आला होता. त्यानंतर रिअलमी नार्जो 60 मध्ये 100MP कॅमेरा होता. आता Realme नवीन 108MP चा स्मार्टफोन घेऊन येत आहे. Realme चा नवीन स्मार्टफोन realme c53 हा आहे.

कधी होणार लाँचिंग?

Realme C54 Smartphone १९ जुलै २०२३ रोजी लाँच होईल. हा फोन दुपारी १२ वाजता लॉन्च होईल. Realme C53 हा कंपनीचा पहिला 108-मेगापिक्सलचा अल्ट्रा क्लिअर कॅमेरा फोन असेल.

तुम्ही लाँच इव्हेंट कुठे पाहू शकाल?
Realme C53 चा लाँच इव्हेंट कंपनीच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर पाहता येईल. यासोबतच, तुम्ही कंपनीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून लॉन्च देखील पाहू शकाल.

Relame C53 चे संभाव्य फीचर्स

वर सांगितल्याप्रमाणे Realme C53 स्मार्टफोनमध्ये ६.७ इंचाचा IPS LCD डिस्प्ले दिला जाईल. त्याचा रिफ्रेश रेट सपोर्ट 90Hz असेल. तर पीक ब्राइटनेस 560 nits असेल. फोनचे स्क्रीन रिझोल्यूशन 1080×2400 पिक्सेल असेल. फोन Android 13 आधारित Realme UI सपोर्टसह येतो. फोनमध्ये ऑक्टाकोर चिपसेट दिला जाऊ शकतो. हा फोन 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज ऑप्शनमध्ये लाँच केला जाऊ शकतो. फोनमध्ये 50 MP चा ड्युअल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. सेल्फीसाठी फोनमध्ये 8MP कॅमेरा दिला जाऊ शकतो. Realme C54 स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली जाऊ शकते. फोनसोबत 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाऊ शकतो.

वाचा : रात्रभर फोन वापरत बसता, झोप लागत नाही? तुमच्या स्मार्टफोनमध्ये आजच बदला ‘या’ सेटिंग्स

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.