Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

खुले आहे करिअरचे विस्तीर्ण मैदान; स्पोर्ट्स मॅनेजमेंट क्षेत्रात करिअरच्या संधी

8

Career In Sports Management After 12th: बॅचलर ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंट (बीएसएम) हा पदवीपूर्व अभ्यासक्रम आहे. क्रीडा व्यवस्थापन आणि प्रशासन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक हा उत्तम पर्याय आहे. क्रीडा उद्योग हे जगभरातील एक मोठे क्षेत्र आहे. या क्षेत्रात मोठी कमाई असून प्रेक्षकांची क्रेझही दिवसागणिक वाढत जाणारी आहे. त्यामुळे क्रीडा व्यवस्थापन हा करिअरच्या अनेक लोकप्रिय पर्यायांपैकी एक महत्त्वाचा पर्याय बनला आहे.

बीएसएममध्ये, सामन्याच्या संघटनेशी संबंधित छोट्या छोट्या गोष्टींचे व्यवस्थापन करणे शिकवले जाते. खेळाशी संबंधित अगदी लहानातल्या लहान गोष्टींचे व्यवस्थापन करणे यात शिकवले जाते. या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. बीएसएम अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी एकूण तीन वर्षे लागतात.

ग्लॅमरने परिपूर्ण असणाऱ्या या क्षेत्रात करिअर आणि आर्थिक भरभराटीचे अनेक मार्ग असतात. शिवाय, क्रीडा क्षेत्रात करिअर करणाऱ्या तरुणांसाठी शिष्यवृत्तीसह विविध सवलतीही दिल्या जातात. जाणून घेऊया, बीएसएम अभ्यासक्रमाशी संबंधित तपशीलांबद्दल…

(वाचा : Education Loan: उच्च शिक्षणासाठी बँकेकडून कर्ज घेताय..? त्याआधी हे नक्की वाचा)

बॅचलर ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंटसाठी कोणत्या पात्रता आवश्यक आहेत?

– बॅचलर ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंट कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी, एखाद्याला मान्यताप्राप्त बोर्डातून कोणत्याही शाखेतून ५० टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
– मग कॉलेजनुसार प्रवेश परीक्षा द्यावी लागेल.
– देशातील बहुतांश महाविद्यालयांमध्ये प्रवेश परीक्षा आणि गुणवत्तेच्या आधारे प्रवेश घेतला जातो.

या संस्थांमधून BSM करण्याकडे विद्यार्थ्यांची पसंती :

1. भारतीय समाज कल्याण आणि व्यवसाय व्यवस्थापन संस्था, कलकत्ता, पश्चिम बंगाल
2. अलगप्पा विद्यापीठ, तामिळनाडू
3. महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
4. इंडियन स्कूल ऑफ बिझनेस
5. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM)

BSM करून पुढे काय..?

  • बॅचलर ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंट कोर्स करून, एखादी व्यक्ती शैक्षणिक संस्थांमध्ये शिकवू शकते, या व्यक्तींना क्रीडा/माध्यम/जाहिरात आणि क्रीडा व्यवस्थापन कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी मिळते.
  • मॅनेजमेंट ट्रेनी, स्पोर्ट्स इन्स्ट्रक्टर, स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट, स्पोर्ट्स डिपार्टमेंट मॅनेजर, सेल्स मॅनेजर आणि प्रोक्युरमेंट मॅनेजर या प्रोफाइलवर काम करून तुम्ही तुमचे करिअर घडवू शकता.
  • हल्ली तर अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट‍्स हा आणखी एक नवीन क्रीडा प्रकार आपल्याकडे रुळला आहे. खेळ आणि साहस अशा दोन्हींचा मिलाफ या अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्‍समध्ये पाहायला मिळतो. या क्रीडा प्रकारांना ‘एक्स्ट्रीम स्पोर्ट‍्स’ किंवा ‘अ‍ॅक्शन स्पोर्ट्‍स’ असेही म्हटले जाते.
  • माऊंटेन बायकिंग, माऊंटेन‌िअरिंग, रॉक क्लायम्बिंग, स्काय डायव्हिंग, हँड ग्लायडिंग, पॅराग्लायडिंग, सर्फिंग, विंडसर्फिंग किंवा स्पीड बोटिंग अशा थरारक खेळांचा समावेश अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्‍समध्येही करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. मात्र,‘अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्‍स’चे क्षेत्र धोकादायक असल्यामुळे आवश्यक ते प्रशिक्षण घ्यायला हवे.

(वाचा : Career BTech: १२वी नंतर इंजिनिअरिंग-बी. टेक करण्याच्या विचारात आहात; या अभ्यासक्रमांमुळे मिळू शकते लाखोंची नोकरी)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.