Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
अनेकदा, पालक विविध गरज उरण करण्यासाठी वैयक्तिक कर्ज (Personal Loan) घेतात. बऱ्याचदा हे कर्ज आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी घेतले जाते. परंतु मुलांच्या शिक्षणासाठी ‘एज्युकेशन लोन घ्यावे कि पर्सनल लोन’ याबद्दल अनेकांच्या मनात आजही संभ्रम पाहायला मिळतो. पण शिक्षणासाठी कुठले कर्ज घेणे फायद्याचे ठरेल याचा तुम्ही कधी विचार केलाय? चला तर, हेच आज जाणून घेऊया.
किती कर्ज हवेय यावरुन ठरू शकतो कर्ज प्रकार :
५० हजार रुपयांपासून साधारण दीड कोटी रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज मिळू शकते. तुम्ही निवडलेल्या शैक्षणिक संस्थेचे रँकिंग, फी आणि वसतिगृह फी, पुस्तकांची किंमत, साहित्य, लॅपटॉपची किंमत यांसारख्या अभ्यासक्रमाशी संबंधित इतर खर्चांची पडताळणी केल्यानंतरच बँक शैक्षणिक कर्ज मंजूर करते.
तर, वैयक्तिक कर्जाची रक्कम ग्राहकाच्या कमाई आणि परतफेड क्षमतेच्या आधारावर ठरवली जाते. पर्सनल लोनसाठी अर्ज करताना अर्ज करणाऱ्याचा (पालकांचा) यांचा सिबिल (CIBIL) स्कोअर महत्त्वाचा ठरतो. अशा परिस्थितीत बँक, वित्तीय संस्था जास्तीत-जास्त ४० लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज (Personal Loan) देतात. हे कर्ज कोणत्याही वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी वापरता येते.
परतफेडीचे प्रकारही वेगवेगळे :
शैक्षणिक कर्ज हे विद्यार्थ्याच्या नावावर असल्यामुळे, हे कर्ज भरण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना कर्जाचा हप्ता हा अभ्यासक्रम सुरू असताना आणि अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर एक वर्षापर्यंत भरावा लागत नाही. याला ‘मोरेटोरियम पीरियड’ (Moratorium period) म्हणतात. म्हणजेच संबंधीत विद्यार्थ्यांला अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर एक वर्षापर्यंत नोकरी मिळते, असे बँकेने गृहीत धरून हे कर्ज दिलेले असते. आहे. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर एक वर्षानंतर ईएमआय सुरू होतो.
(वाचा : Education Loan : पहिली ते बारावीच्या शिक्षणासाठी कर्जाची सुविधा; या बँकेतून मिळते शिक्षणासाठी कर्ज)
याशिवाय, बँक मेडिकल इमर्जन्सी, बेरोजगारी आणि इनक्युबेशन पीरियडदरम्यान किंवा एखाद्या विद्यार्थ्यानं अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर स्टार्टअप सुरू केल्यास ‘मोरेटोरियम पीरियड’ वाढवू शकते. कर्जाचा कोणताही हफ्ता सुरु करण्यापूर्वी बँक विद्यार्थ्यांना याबद्दल विचारून, विद्यार्थ्यांच्या इतर गरजा लक्षात घेऊन कर्जाच्या हफ्त्याची रक्कम ठरवते.
याउलट, वैयक्तिक कर्जा घेतल्यानंतर रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होताच. त्याच्या पुढील महिन्यापासून कर्जाचा हप्ता म्हणजेच ‘ईएमआय’ला सुरुवात होते. त्यामुळे एखाद्या पालकाने त्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी वैयक्तिक कर्ज घेतले, तर संबंधित पालकाला कर्ज मिळाल्यानंतर पुढील महिन्यापासून ईएमआय भरणे बांधकारक असते.
शैक्षणिक कर्जावर टॅक्स सवलत :
0 शैक्षणिक कर्जावर (Education Loan) संबंधित विद्यार्थ्यांला टॅक्स माफीचा लाभ मिळतो. आयकर कायद्याच्या कलम ‘८० ई (80 E)’अंतर्गत, विद्यार्थी 0 कर्जाच्या परतफेडीच्या पहिल्या ८ वर्षांच्या व्याजावरील रकमेवर टॅक्स सवलतीचा लाभ घेऊ शकतो.
0 वैयक्तिक कर्जावर मात्र कुठलीही टॅक्स सवलत मिळत नाही.
कर्जाची मुदतवाढ :
- शैक्षणिक कर्जाच्या परतफेडीसाठी जास्तीतजास्त १५ वर्षांची मुदत असते.
- दीर्घ मुदतीमुळे ईएमआय रक्कम कमी असते, त्यामुळे विद्यार्थी ती सहजपणे देऊ शकतात. तर, वैयक्तिक कर्जाची मुदत ही जास्तीतजास्त ७ वर्षांची असते.
(वाचा : Education Loan: उच्च शिक्षणासाठी बँकेकडून कर्ज घेताय..? त्याआधी हे नक्की वाचा)
व्याजदर किती :
- वैयक्तिक कर्जाच्या तुलनेत शैक्षणिक कर्जावर कमी व्याजदर असतो.
- सध्या शैक्षणिक कर्जावरील व्याजदर ८.५० ते १५ टक्के प्रतिवर्ष आहे.
- काही बँका मुलींना शैक्षणिक कर्जावर अतिरिक्त ०.५ टक्के सूट देतात.
- दुसरीकडे, वैयक्तिक कर्जाचे व्याज दर साधारणपणे १०.५० ते २० टक्के प्रतिवर्ष असते. म्हणजेच, जरी तुम्ही केवळ शिक्षणाशी संबंधित खर्चासाठी वैयक्तिक कर्ज घेत असाल तर तुम्हाला जास्त व्याज द्यावे लागेल.
जामिनदाराची आवश्यकता असते का?
देशात शिक्षणासाठी ४ लाख रुपयांपर्यंतच्या शैक्षणिक कर्जासाठी जामिनदाराची गरज नाही. केवळ शैक्षणिक आधारावर ते मिळते. ४ लाखांपेक्षा जास्त शैक्षणिक कर्ज हवे असल्यास पालक हे सह-अर्जदार (Co-applicant) असतात. त्यासाठी मालमत्ता, बँकेच्या ठेवी (Bank Savings), म्युच्युअल फंड (Mutual Funds) आणि विमा पॉलिसी (Various Policies) सुरक्षा म्हणून संबंधित बँकेत जमा कराव्या लागतात.
तर वैयक्तिक कर्जाच्या बाबतीत मार्जिन मनी नसते. येथे कोणत्याही जामिनदाराची आवश्यकता नसते.
कोणते कर्ज घेणे फायद्याचे ?
- शैक्षणिक कर्जावर कमी व्याजदर, कर्ज परतफेडीसाठी दीर्घ मुदत, मोरेटोरियम पीरियड आणि टॅक्स सवलत यांसारखे फायदे मिळतात.
- पण, दुसरीकडे चार लाखांपेक्षा जास्त शैक्षणिक कर्ज घेताना हमीदार नसल्यामुळे किंवा गहाण ठेवण्यासाठी अपुरे तारण असल्यामुळे शैक्षणिक कर्ज मिळण्यास अडचणी येऊ शकतात. अशावेळी अशावेळी तुम्ही वैयक्तिक कर्ज (Personal Loan) चा विचार करू शकता.
- कारण वैयक्तिक कर्जात कर्जदाराला तारण किंवा मालमत्तेची कागदपत्र सादर करण्याची गरज भासत नाही.
- हे कर्ज फारच कमी कागदपत्रांवर मिळते.
- बँक वैयक्तिक कर्ज घेणाऱ्या व्यक्तीच्या सिबिल स्कोअर आणि महिन्याचे उत्पन्न यावर अधिक लक्ष केंद्रित करते.
- या शिवाय, जर पालकांना कर्ज केवळ ३ ते ४ वर्षांसाठी हवं असेल, तर वैयक्तिक कर्ज हाच चांगला पर्याय आहे.
(वाचा : Career In AI: आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात करिअर करायचंय; या कोर्सेसनंतर मिळणार कामाची उत्तम संधी)