Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
सर्वसाधारणपणे, यूएसबी पोर्टमधील समस्या इलेक्ट्रिकल ब्रेकडाउनमुळे येत असतात. असं झाल्यानंतर तुमचा लॅपटॉप त्याला अटॅच केलेलं USB डिव्हाइस ओळखू शकत नाही किंवा अटॅच झालं असताना युएसबी डिव्हाईस फ्रीज होऊ शकतं. अशामध्ये जर तुमच्याकडे योग्य सामग्री असल्यास आणि रिपेअरिंगचा थोडाफार अनुभव असल्यास तुम्ही घरीच हे रिपेअर करु शकता. पण असं नसल्यास तुम्ही रिपेअर करणाऱ्या तज्ज्ञाशी संपर्क साधू शकता.
USB Port खराब होणं टाळायचं असेल तर खालील टिप्स लक्षात ठेवा.
- सर्वप्रथम तुम्ही तुमच्या लॅपटॉपची वॉरंटी तपासली पाहिजे. तुमची वॉरंटी अद्याप संपली नसल्यास, एखाद्या तज्ज्ञाकडून ते तपासा आणि रिपेअर करा. यासाठी तुम्ही नक्कीच सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊ शकता.
- तुमची वॉरंटी संपली असली तरी तुम्ही सर्व्हिस सेंटर किंवा रिपेअरिंग शॉपमध्ये जाऊन तज्ज्ञांशी मदतीशी संपर्क साधू शकता. फक्त यासाठी तुम्हाला थोडे अधिक पैसे मोजावे लागतील.
- पण तुम्हाला थोडीफार तांत्रिक माहिती असल्यास स्वतः दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे पण ते अत्यंत काळजीपूर्वक केले पाहिज
- अधिक माहिती नसताना तुम्ही लॅपटॉप स्वतः दुरुस्त करणं टाळायला हवं कारण असे केल्याने तुमच्या लॅपटॉपची वॉरंटी रद्द होऊ शकते.
- तसंच कोणतंही डिव्हाईस वापरत असताना ते योग्यप्रकारे अटॅच आणि रिमूव्ह करायला हवं. सेफली रिमूव्हचा एक ऑप्शन असतो तो देखील वापरला पाहिजे.
वाचा : बजेट लॅपटॉप शोधताय? जिओनं आणलं JioBook फक्त १६,४९९ रुपयांना, जबरदस्त आहेत फीचर्स