Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
या क्षेत्रात काम करणे खरेतर एक प्रकारे आव्हानच म्हणावे लागेल. वेळी-अवेळी येणाऱ्या पाहुण्यांचे हसतमुखाने स्वागत करणे, त्यांच्या मागण्या पूर्ण करणे, त्यांचे आदरातिथ्य करणे, त्यांच्या तक्रारी ऐकून त्यांचे निरसन करणे अशा अनेक जबाबदाऱ्या हॉस्पिटॅलिटी किंवा हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतल्यानंतर पार पाडाव्या लागतात. याशिवाय हाताखालील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे, स्टाफ सांभाळणे, स्टँडर्ड जपणे ही आणि अशी कामे त्यांच्या कामाचा भाग असतो.
हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात कामाची ठराविक वेळ नसून येथे काम करणाऱ्यांना विविध शिफ्टमध्ये काम करावे लागते, तर काही वेळेस सलग अनेक तास काम करावे लागते. शांत राहून त्यांच्या समस्या सोडवायच्या असतात. त्यांच्यासमोर सहनशक्ती आणि संयम राखावा लागतो. इथे उद्धट स्वभावाची व्यक्ती चालत नाही. कामाचा ताण सहन करण्याची ताकद तुमच्याकडे असायला हवी.
(वाचा : Career in Advertising: ‘जाहीरात क्षेत्र’ खुणावतंय पण अनेक प्रश्न असतील तर करिअरचा पर्याय निवडण्याआधी जाणून घ्या)
हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील विविध करिअर विभाग :
- अन्न आणि पेय (फूडअँड बेव्हरेज)
- हाऊसकीपिंग
- अकांऊटिंग
- मार्केटिंग
- रिक्रिएशन
- कम्प्युटर अॅप्लिकेशन्स
- फायनान्शिअल मॅनेजमेंट
- मेण्टेनन्स
- सिक्युरिटी
- पब्लिक रिलेशन्स
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
हॉटेल मॅनेजमेंटमधील अनेक डिप्लोमा, डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस उपलब्ध आहेत. या क्षेत्रातील सर्टिफिकेट कोर्सही उपलब्ध आहेत. दहावी किंवा बारावीनंतर या सर्टिफिकेट कोर्सला प्रवेश घेता येईल. याशिवाय ज्या विद्यार्थ्यांना प्रशासकीय (अॅडमिनिस्ट्रेटिव्ह) काम करण्यात रस असेल त्यांना मॅनेजमेंटची पदवी घेता येईल.
(वाचा : World’s Top 10 Entrance Exams: जगातील टॉप १० प्रवेश परीक्षा, ज्या प्रत्येक विद्यार्थ्याला माहीत असणे गरजेचेच…)
इथे करू शकता नोकरी :
- हॉटेल/ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटमधील डिग्री घेतल्यावर तुम्हाला पुढील विभागात नोकरीच्या संधी मिळू शकतात. रेस्टॉरंट मॅनेजमेंट/फास्ट फूड जॉइंट मॅनेजमेंट
- क्लब/ रिक्रिएशन अँड हेल्थ सेंटर मॅनेजमेंट
- केटरिंग-हॉस्पिटल, इन्स्टिट्यूशनल आणि इंडस्ट्रिअल केटरिंग
- एअरलाइन केटरिंग आणि केबिन सर्व्हिसेस, क्रूझ लायनर
- सरकारी मालकीची केटरिंग डिपार्टमेंट्स जसे रेल्वे, आर्म्ड फोर्सेस, मंत्रालयातील खाद्यसेवा इत्यादी.
- हॉटेल आणि रेस्टॉरंटसाठी आवश्यक उपकरणे आणि सर्व्हिसेस यांचे उत्पादन आणि पुरवठा करणारे
‘हॉस्पिटॅलिटी’साठी महत्त्वाचे :
■ हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीची वाढ झपाट्याने होत आहे.
■ शिफ्टमध्ये काम करावे लागते.
■ सहनशक्ती आणि संयम गरजेचा.
■ परदेशी भाषा उपयुक्त ठरू शकते.
या कोर्सेस चा खर्च किती…?
बारावीनंतर हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी काही ठराविक गव्हर्मेंट कॉलेज उपलब्ध आहेत.तसेच प्रायव्हेट कॉलेजमध्ये सुद्धा तुम्ही प्रवेश (Admission) घेऊन तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंट चे अभ्यासक्रम करता येतात. हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी वेगवेगळे युनिव्हर्सिटी आणि कॉलेजांनुसार खर्च वेगवेगळा येतो. तरी, साधारणपणे, खाजगी संस्थांमध्ये (Private Institution) एक ते दीड लाख रुपये वर्षाला तर, पन्नास हजार ते लाख रुपयांपर्यत सरकारी संस्थेमध्ये या कोर्ससाठी खर्च करावा लागतो.
(वाचा : Success Story : आधी PCS नंतर IAS अधिकारी बनून करतेय काम; देशसेवेसाठी या अभिनेत्रीने सोडले मनोरंजनविश्व)
हॉटेल मॅनेजमेंट केल्यानंतर मिळतो एवढा पगार :
- हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यास पूर्ण केल्यावर किती पागर मिळतो यापेक्षा, हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण झाल्यातर तुम्ही कुठे काम करता यावर तुमचा पगार अवलंबून असतो. एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये (Five Star Hotel) जर काम करत असाल तर तुम्हा सुरुवातीला साधारणपणे १५ ते २० हजार रुपये पगार मिळू शकतो.
- त्यानंतर, तुम्हाला कामाचा अनुभव आल्यानंतर साधारणपणे ५० आजार किंवा त्याहून अधिक पगार मिळू शकतो.
- हॉटेल व्यवस्थापनातील विविध कोर्सेस करून त्यांचे प्रमाणपत्र प्राप्त करून तुम्ही तुमचे उत्पन्न वाढवू शकता.
- हॉटेल मध्ये वेगवेगळी पद आणि काम असतात.त्यामुळे तुमचे पद आणि कामाचे स्वरूप यावरही तुमचा पगार अवलंबून असतो.
- तसेच, तुम्ही ज्या हॉटेलमध्ये काम करत आहात त्याचे व्यवस्थापन कसे आहे, त्याठिकाणी गुणवत्ता कशी आहे यावरही तुमचा पगार अवलंबून असतो.
- शिवाय, हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्ही तुमचे स्वत:चा व्यवसाय सुरू करू शकता आणि खूप मोठ्या प्रमाणात पैसे कमवू शकता.
- सोबतच, हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर तुम्हाला चांगल्या हॉटेल मध्ये सहज कामे उपलब्ध होतात.ज्याची आज प्रत्येक ठिकाणी हॉटेल मध्ये मागणी आहे.