Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

११ इंचाची स्क्रीन, 8000mAh ची दमदार बॅटरी, Redmi Pad SE अखेर लाँच

11

नवी दिल्ली : Redmi Pad SE Launched : बजेट स्मार्टफोन तयार करण्यात आघाडीवर असणाऱ्या Xiaomi ने अखेर आपलाRedmi Pad SE हा टॅब्लेट लाँच केला आहे. रेडमी पॅड एसई हा कंपनीच्या पहिल्या टॅबलेट रेडमी पॅडचा अपग्रेडेड प्रकार आहे. रेडमी पॅड गेल्या वर्षी (2022) मध्ये लाँच करण्यात आला होता. लेटेस्ट Redmi Pad SE मध्ये ११ इंच फुलएचडी+ एलसीडी स्क्रीन आहे. तसंच क्वाड स्पीकर्स, डॉल्बी अॅटमॉस आणि 8000mAh बॅटरीसारखे दमदार फीचर्स यात आहेत. चलातर याबद्दल सविस्तर जाणून घेऊ…

रेडमी पॅड एसई तयार करताना अॅल्युमिनियम अलॉय युनिबॉडी वापरण्यात आली आहे. त्यामुळे Redmi Pad SE टॅबलेट 7.4mm इतका स्लीक आहे. यामध्ये ११ इंच (1920×1200 pixels) FullHD+ डिस्प्ले आहे. स्क्रीन 30Hz ते 90Hz दरम्यान रिफ्रेश रेट देते. हा Redmi टॅबलेट TÜV Rheinland Flicker सर्टिफिकेशनसह येतो. या टॅबलेटमध्ये 4 GB, 6 GB, 8 GB RAM असे पर्याय आहेत. हा टॅबलेट 128 जीबी इनबिल्ट स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे. रेडमी टॅबलेटला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 मोबाइल प्लॅटफॉर्म मिळतो. ग्राफिक्ससाठी Adreno 610 GPU देण्यात आला आहे. याशिवाया हा Redmi Pad SE Android 13 वर आधारित MIUI 14 सह लाँच करण्यात आला आहे. या डिव्हाइसमध्ये ८ मेगापिक्सेलचा रेअर कॅमेरा आहे ज्यामध्ये अपर्चर F/2.3 आहे. टॅबलेटमध्ये ५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा एफ/2.2 अपर्चरसह आहे. यात फेस अनलॉक वैशिष्ट्यही आहे. याचे वजन 478 ग्रॅम आहे. याशिवाय Redmi Pad SE मध्ये 3.5mm हेडफोन जॅक, स्टिरीओ स्पीकर आणि डॉल्बी अॅटमॉस सपोर्ट आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, या टॅबलेटमध्ये Wi-Fi 802.11 ac, Bluetooth 5.0 आणि USB Type-C सारखे फीचर्स आहेत. वर सांगितल्याप्रमाणे बॅटरी 8000mAh असून 10W चार्जिंग सपोर्ट आहे.

Redmi Pad SE ची किंमत किती?
Redmi Pad SE च्या 4 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत १९९ युरो (सुमारे १८,१०० रुपये) आहे. तर 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट २२९ युरो (सुमारे २०,८०० रुपये) आणि 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट २४९ युरो (सुमारे २२,६०० रुपये) मध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हा रेडमी टॅबलेट सध्यातरी युरोपमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. Redmi Pad SE लॅव्हेंडर पर्पल, ग्रेफाइट ग्रे आणि मिंट ग्रीन रंगांमध्ये येतो.

वाचा: कमी बजेटमध्ये मिळेल दमदार स्मार्टफोन, २० हजारांहून स्वस्त स्मार्टफोनची यादी एकदा पाहाच

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.