Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
जलाशक्ती मंत्रालयाच्या विविध विभागात मास कम्युनिकेशनआणि पत्रकारिता शिकणार्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिपची संधी
सदर इंटर्नशिपसाठी निवड होणार्या विद्यार्थ्यांना जलाशक्ती मंत्रालय अंतर्गत येणार्या विविध विभागांच्या मीडिया आणि सोशल मीडिया कामांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. हा अल्प-कालीन इंटर्नशिप कार्यक्रम असून, या इंटर्नशिप अंतर्गत विद्यार्थ्यांना तीन ते सहा महीने सदर पददनवर काम करून शिकण्याची संधीही मिळणार आहे.
(अर्जाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी स्कॅन करा)
पात्रता :
- मान्यताप्राप्त संस्था आणि विद्यापीठांमधील मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांकडून जलशक्ती मंत्रालयाच्या जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाने इंटर्नशिप कार्यक्रमासाठी अर्ज करू शकतात
- मास कम्युनिकेशन किंवा पत्रकारिता या विषयातील बीए/एमए अभ्यासक्रमांमध्ये किंवा एमबीए (मार्केटिंग) इन मास कम्युनिकेशन
(सदर इंटर्नशिपमधील पात्रतेबद्दलच्या अधिक महितीसाठी जलशक्ती मंत्रालयाच्या जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाने प्रसिद्ध केलेली अधिकृत जाहीरात वाचा)
असा करा अर्ज :
- जलशक्ती मंत्रालयाच्या जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागातील इंटर्नशिपसाथी अर्ज करू इच्छिणार्या उमेदवारांना मूळ जाहीरातीमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला अर्ज भरणे अनिवार्य आहे.
- सोबत, नाहरकत प्रमाणपत्र जोडणे आवशयक आहे.
- अर्ज भरल्यानंतर शासनाच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज सबमीट करणे आवश्यक.
(वाचा : दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा आता वर्षातून दोनदा होणार; तर, ११वी, १२वी मध्ये विषय निवडीचे स्वातंत्र्य)
इंटर्नशिपचे फायदे :
सदर इंटर्नशिप कार्यक्रमासाठी निवड होणार्या उमेदवारांना प्रति महिना १० हजार रुपये मानधन दिले जाईल.
इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाईल.
अशी पार पडणार निवड प्रक्रिया :
- इंटर्नची निवड उमेदवाराच्या मूल्यमापनाच्या आधारे केली जाईल.
- वैयक्तिक मुलाखत, आवश्यक पात्रता लक्षात घेऊ विद्यार्थ्यांना इंटर्नशिपची संधि मिळेल. मुलाखतीनंतर निवड झालेल्या उमेदवारांना ईमेलच्या माध्यमातून कळवले जाईल.
जलशक्ती मंत्रालयाच्या जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाने इंटर्नशिपची मूळ जाहीरात पहाण्यासाठी येथेहे क्लिक करा.
जलशक्ती मंत्रालयाच्या जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाने इंटर्नशिप अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
जलशक्ती मंत्रालयाच्या जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
(वाचा : Cochin Shipyard Recruitment 2023: कोचीन शिपयार्ड भरती अंतर्गत इंजिनीयर्सना नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ पदावर भरती सुरु)