Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सॅमसंगपेक्षा स्वस्तात दुमडणारा मोबाइल; दोन-दोन डिस्प्लेसह OPPO Find N3 Flip लाँच

11

Samsung Galaxy Z Flip 5 काही दिवसांपूर्वीच भारतीय बाजारात सेलसाठी उपलब्ध झाला आहे. ह्या सेगमेंटमध्ये सॅमसंग सर्वात पुढे आहे परंतु आता ओप्पो, शाओमी आणि विवोकडून देखील टक्कर मिळत आहे. आज टेक ब्रँड ओप्पोनं देखील आपला फोल्डेबल स्मार्टफोन OPPO Find N3 Flip लाँच केला आहे. सध्या चीनमध्ये आलेला हा फोन लवकरच भारतात देखील येऊ शकतो.

ओप्पो फाइंड एन३ फ्लिपची किंमत

ओप्पो फाइंड एन३ फ्लिप च्या १२जीबी रॅम व १२८जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत ६७९९ चायनीज युआन म्हणजे ७७,२०० रुपये ठेवण्यात आली आहे. तर १२जीबी रॅम + २५६जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ७५९९ चायनीज युआन म्हणेज ८६,२०० रुपयांच्या आसपास आहे. हा मोबाइल Moonlight Muse, Mist Rose आणि Mirror Night कलरमध्ये लाँच झाला आहे.

वाचा: Apple कडून आलं निमंत्रण! iPhone 15 Series च्या लाँचची तारीख ठरली

ओप्पो फाइंड एन३ फ्लिपचे स्पेसिफिकेशन्स

फोनमध्ये मुख्य डिस्प्लेसह एक कव्हर डिस्प्ले मिळतो. आयताकृती कव्हर डिस्प्ले बाहेरच्या बाजूला आहे त्याच्या जोडीला कॅमेरा सेटअपमध्ये तीन सेन्सर देण्यात आले आहेत. थ्रीडी कर्व बॅक पॅनल असलेल्या ह्या फोनच्या उजवीकडे वॉल्यूम रॉकर व पावर बटन मिळतो, तर डावीकडे शार्टकट बटन आहे. खालच्या बाजूला यूएसबी पोर्ट, स्पिकर तसेच सिम ट्रे मिळतो.

ओप्पो फाइंड एन३ फ्लिप ६.८० इंचाचा मुख्य डिस्प्ले देण्यात आला आहे जो फुलएचडी+ रिजोल्यूशन असलेला अ‍ॅमोलेड पॅनल आहे. हा डिस्प्ले १२०हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये ३.३६ इंचाचा अ‍ॅमोलेड कव्हर डिस्प्ले मिळतो.

ओप्पो मोबाइल अँड्रॉइड १३ आधारित कलरओएस १३ वर चालतो. प्रोसेसिंगसाठी मीडियाटेक डायमेन्सिटी ९२०० ऑक्टाकोर प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. तर ग्राफिक्ससाठी माली-जी७१५ जीपीयू आहे. त्याचबरोबर १२जीबी रॅम आणि २५६जीबी पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे.

फोटोग्राफीसाठी हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बॅक पॅनलवर ओआयएस फीचर असलेला ५० मेगापिक्सलचा सेन्सर, ३२ मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स आणि ८ मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे तर फ्रंट पॅनलवर ३२ मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर देण्यात आला आहे.

वाचा: इंस्टाग्रामवर कोणीतरी ब्लॉक केलंय का? असं जाणून घ्या कोणी तुम्हाला Instagram वर ब्लॉक केलंय

पावर बॅकअपसाठी OPPO Find N3 Flip ४,३००एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. तसेच ह्या फोल्डेबल फोनमध्ये ४४वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळते. फोनमध्ये सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. ह्या मोबाइलमध्ये ५जी व ४जीसह एनएफसी सारखे फीचर्स देखील मिळतात.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.