Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
इन्स्टाग्रामने सामान्य वापरकर्त्यांसाठी हे फीचर आणल्यास, वाढलेल्या वेळेसह व्हिडिओ पाहणे सोपे होणार आहे. केवळ व्हिडिओ कंटेट पाहणाऱ्या वापरकर्त्यांसाठीच नाही तर निर्मात्यांना ते अपलोड करणे देखील सोपे होईल. त्यामुळे प्लॅटफॉर्मवरील एंगेजमेंट वाढण्याची शक्यता आहे. इन्स्टाग्राम रील मर्यादा ३ मिनिटांवरून १० मिनिटांपर्यंत वाढवून TikTok, युट्यूबला टक्कर देत असल्याचं म्हटलं जात आहे. काही काळापूर्वीच TikTok ने त्याच्या व्हिडिओंचा कालावधी देखील वाढवला होता.
अलीकडे, इंस्टाग्रामचे प्रमुख अॅडम मोसेरी म्हणाले होते की कंपनी असे मार्ग शोधत आहे ज्याद्वारे कंटेट क्रिएटर्स त्यांच्या फॅन्सना अधिक चांगले आणि अधिक बिझी ठेवू शकतात. ‘IG अपडेट्स’ चॅनेलवरील एका पोस्टमध्ये, मोसेरीने सांगितले की प्लॅटफॉर्मवर आणखी एका वैशिष्ट्याची चाचणी केली जात आहे ज्याद्वारे सार्वजनिक खाते वापरकर्ते कोणत्याही सार्वजनिक फीड पोस्टवरील कंमेट्स शेअर करू शकतात. या महिन्याच्या सुरुवातीला, Instagram ने आपल्या प्लॅटफॉर्मवर अनेक नवीन फीचर्स आणले होती.
वाचा: इंस्टाग्रामवर कोणीतरी ब्लॉक केलंय का? असं जाणून घ्या कोणी तुम्हाला Instagram वर ब्लॉक केलंय