Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
या भरतीसंदर्भात ‘एसबीआय’ अधिसूचना जाहीर केली आहे. अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून २७ सप्टेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या पदांसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया तीन टप्प्यात विभागली गेली आहे. सुरूवातीला पूर्व परीक्षा होईल, त्यानंतर मुख्य परीक्षा आणि त्यानंतर मुलाखत होईल. पूर्व परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांनाच मुख्य परीक्षा देता येईल. मुख्य परीक्षा आणि मुलाखत या दोन्ही टप्प्यावर उत्तीर्ण ठरलेल्या उमेदवारांनाच नियुक्त केले जाईल. या भरतीचे सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे..
या भरतीसाठीची पदे आणि पदसंख्या:
परिविक्षाधीन अधिकारी/ प्रोबेशनरी ऑफिसर
एकूण रिक्त जागा २०००
त्याची विभागणी पुढीलप्रमाणे:
जनरल: ८१० जागा
ओबीसी: ५४० जागा
ईडब्ल्यूएस: २०० जागा
एससी: ३०० जागा
एसटी: १५० जागा
एकूण : २००० जागा
वेतन श्रेणी:
६५ हजार ७८० ते ६८ हजार ५८० रूपये.
(वाचा: HPCL Recruitment 2023: ‘हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड’मध्ये भरती.. जाणून घ्या कसा करायचा अर्ज..)
शैक्षणिक पात्रता:
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा कोणतीही समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. तसेच पदवीच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी उमेदवार देखील अर्ज करू शकतात. मुलाखतीच्या वेळी त्यांना पदवीचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा:
खुल्या प्रवर्गासाठी कमीत कमी २१ ते जास्तीत जास्त ३० वर्षे. कमाल वयोमर्यादेत ओबीसी प्रवर्गाला ३ वर्षांची तर एस/एसटी वर्गाला ५ वर्षांची सूट देण्यात आली आहे.
अर्ज शुल्क:
जनरल, ईडब्ल्यूएस, ओबीसी प्रवर्गासाठी ७५० रुपये तर एससी, एसटी, पीडब्ल्यूडी प्रवर्गाला अर्ज शुल्क माफ आहे.
अर्ज पद्धती:
ऑनलाईन
अर्ज भरण्याची प्रक्रिया ७ सप्टेंबर २०२३ पासून सुरू होणार असून २७ सप्टेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
या भारतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असल्यास बँकेच्या https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers या ‘करिअर’ वेबसाइटला भेट देऊन नोंदणी करणे आवश्यक आहे.
https://ibpsonline.ibps.in/sbipoaug23/ लिंकवर जाऊन तुम्ही नोंदणी करून थेट अर्ज भरू शकता.
या भरतीची सविस्तर अधिसूचना वाचण्यासाठी https://drive.google.com/file/d/19sOs284QxJvPiz6Q3HbBvqwIOQimoDH1/view या लिंकवर पीडीएफ फाइल उपलब्ध आहे.
निवड प्रक्रिया:
प्रिलिम्स/ पूर्व लेखी परीक्षा – १०० गुण
मुख्य लेखी परीक्षा + वर्णनात्मक परीक्षा – २५० गुण
मुलाखत/ गट चर्चा- ५० गुण
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय तपासणी
(वाचा: SBI Recruitment 2023: ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ मध्ये १०७ जागांसाठी भरती! जाणून घ्या काय आहे पात्रता..)