Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

स्पेशल सेलमध्ये स्पेशल डिस्काउंट; स्वस्तात Realme C51 विकत घेण्यासाठी आज फक्त २ तासांचा वेळ

26

ह्याच आठवड्यात Realme C51 स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच करण्यात आला आहे. हा फोन येत्या ११ सप्टेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे परंतु आज म्हणजे ७ सप्टेंबर रोजी हा फोन स्पेशल सेल अंतर्गत संध्यकाळी ६ वाजता उपलब्ध होईल. चला जाणून घेऊया ह्या स्पेशल सेलमधील खास ऑफर्स.

Realme C51 ची किंमत आणि लाँच ऑफर्स

Realme C51 ची किंमत ८९९९ रुपये आहे आहे, हा फोन ४जीबी रॅम आणि ६४जीबी स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. एसबीआय आणि आयसीआयसीआय बँकेच्या कार्ड धारकांना ह्या सेलमध्ये ५०० रुपयांचा डिस्काउंट दिला जाईल. रियलमी सी५१ च्या स्पेशल सेलची सुरुवात आज संध्यकाळी ६ वाजता सुरु होईल. हा सेल ८ वाजेपर्यंत फ्लिपकार्ट आणि रियलमी स्टोरवर सुरु राहील. फोन ११ सप्टेंबरपासून ओपन सेलसाठी उपलब्ध होईल.

वाचा : 4 कॅमेरे, दोन डिस्प्ले! Xiaomi MIX Flip फोन आयएमआय सर्टिफिकेशनवर दिसला, लवकरच येऊ शकतो बाजारात

Realme C51 चे स्पेसिफिकेशन्स

Realme C51 मध्ये ६.७-इंचाचा एचडी+ आयपीएस एलसीडी मिनी कॅप्सूल डिस्प्ले आहे. हा पॅनल १६०० x ७२० पिक्सल रिजॉल्यूशन, ९० हर्ट्झ रिफ्रेश रेट, १८०हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट आणि ५६०निट्झ पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. डिवाइसचे डायमेंशन १६७.२× ७६.७ × ७.९९मिमी आणि वजन १८६ ग्राम आहे.

या डिवाइसमध्ये ऑक्टा-कोर युनीसोक टी ६१२ चिपसेट मिळतो जो १२एनएम प्रोसेसवर बनला आहे. तर ग्राफिक्ससाठी माली-जी५७ जीपीयू देण्यात आला आहे. जोडीला ४जीबी एलपीडीडीआर४एक्स रॅम आणि १२८जीबी इंटरनल स्टोरेज आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीनं २टीबी पर्यंत वाढवता येते. तर रॅम ८जीबी पर्यंत व्हर्च्युअली वाढवता येतो.

फोनच्या मागे असलेल्या ड्युअल कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅश, ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि एक डेप्थ सेन्सर आहे. तर फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आहे. पावर बॅकअपसाठी ३३वॉट सुपरवुक फास्ट चार्जिंगसह ५,०००एमएएचची बॅटरी आहे.

वाचा : Smartwatch ची बॅटरी लवकर संपतेय? आत्ताच करा हे उपाय, झटकन वाढेल बॅकअप

रियलमी सी५१ अँड्रॉइड १३ आधारित रियलमी युआय टी एडिशनवर चालतो. मोबाइलमध्ये सिक्योरिटीसाठी साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरचा वापर करण्यात आला आहे. तसेच टाईप सी चार्जिंग पोर्ट, सिंगल स्पीकर, ३.५मिमी ऑडियो जॅक, ड्युअल सिम ४जी, वाय-फाय, ब्लूटूथ ५.० सारखे फीचर्स मिळतात. हा फोन मिंट ग्रीन आणि कार्बन ब्लॅक कलरमध्ये विकत घेता येईल.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.