Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अकोल्यामध्ये आज शासन आपल्या दारी रोजगार मेळावा! २०० हून अधिक उमेदवारांना मिळणार नोकरीची संधी..​

15

Shasan Aplya Dari Rojgar Melava Akola: राज्यातील बेरोजगारी कमी करण्यासाठी राज्य सरकार कसोशीने प्रयत्न करत आहे. तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने पुढाकार घेत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्याचे ठरवले आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा मेळावा घेण्यात येतो. आज, बुधवार १३ सप्टेंबर २०२३ रोजी अकोला जिल्ह्यात शासनाचा रोजगार मेळावा होणार आहे.

महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राज्यभरात सुरू आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासोबतच प्रत्येक जिल्ह्यातील तरुणांना रोजगार देखील मिळवून दिला जात आहे. यासाठी ‘शासन आपल्या दारी’ या योजनेअंतर्गत ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा/ जागेवरच निवड’ ही मोहीम राबवली जात आहे. याच अंतर्गत आज अकोला येथे २५० हून अधिकांना नोकरीची संधी मिळणार आहे.

अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अकोला यांचे संयुक्त विद्यमाने (‘NAPS / NATS) आयटीआय, इंजिनिअरिंग, अकाऊंटस, दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यामध्ये ट्रेनी, ऑपरेटर, टिम लीडर, अकाऊंटंट, सुपरवायझर अशी अनेक पदे भरण्याक्त येणार आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करून मेळाव्यात उपस्थित राहायचे आहे. उमेदवारांची निवड ही ऑफलाइन पद्धतीने मेळाव्यातच केली जाईल.

(वाचा: ASRB Recruitment 2023: ‘कृषी वैज्ञानिक भरती मंडळ’ मध्ये ३६८ पदांची भरती! जाणून घ्या नोकरीचे सविस्तर तपशील..)

मेळाव्याची तारीख – बुधवार १३ सप्टेंबर २०२३

अर्ज पध्दती – ऑनलाईन नोंदणी

राज्य – महाराष्ट्र

विभाग – अमरावती

जिल्हा – अकोला

मेळाव्याचा पत्ता – जिल्‍हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला

एकुण पदे – २५४+

अर्ज करण्यासाठी https://rojgar.mahaswayam.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

या भरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी https://drive.google.com/file/d/1Deg1lIRI8McECuZnJoq8pWviiWEV74Y4/view या लिंकवर क्लिक करावे.

या भरतीबाबत काही शंका असल्यास अकोला कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक ०७२४- २४३३८४९ किंवा ९६६५७७५७७८ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

(वाचा: Nashik Mahanagar Palika Bharti 2023: नाशिक महानगरपालिकेत पशुसंवर्धन विभागात भरती! जाणून घ्या कसा करायचा अर्ज..)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.