Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सिंगल चार्जमध्ये १७ तास चालेल हा लॅपटॉप; Tecno Megabook T1 ची भारतात एंट्री

12

Tecno Megabook T1 लॅपटॉप भारतात लाँच झाला आहे. कंपनीनं ह्या लॅपटॉपमध्ये नॅनो-अ‍ॅल्युमिनियम अलॉयचा वापर केला आहे. तसेच ह्या लॅपटॉपमध्ये ११व्या जनरेशनचा इंटेल कोर प्रोसेसर मिळतो. तसेच लॅपटॉपमध्ये ५१२जीबी स्टोरेज आणि दमदार बॅटरी देण्यात आली आहे. हा लॅपटॉप भारतीय बाजारात लेनोवो, आसुस आणि एचपी सारख्या ब्रँड्सना चांगली टक्कर देतो. विशेष म्हणजे हा लॅपटॉप काही दिवसांपूर्वी टेक्नो कॅमोन २० सीरीजसह शोकेस करण्यात आला होता.

Tecno Megabook T1 चे स्पेसिफिकेशन

टेक्नोच्या लॅपटॉपमध्ये व्हायब्रँट कलर असलेला फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचा आकार १५.६ इंच आहे. ह्यात बॅकलिट की-बोर्ड देण्यात आला आहे. त्याचबरोबर लॅपटॉपमध्ये सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट सेन्सरसह २मेगापिक्सलचा फुलएचडी कॅमेरा आणि यूएसबी ३.१ टाइप सी आणि एचडीएमआय १.४ सारखे कनेक्टिव्हिटी फीचर मिळतात.

वाचा: Itel ने लाँच केला iPhone सारखा लुक असणारा स्मार्टफोन, Itel S23 Plus काय आहे खास?

लॅपटॉपमध्ये शानदार साउंडसाठी DTS X Immersive साउंडचा सपोर्ट देण्यात आला आहे. स्मूद वर्किंगसाठी लॅपटॉपमध्ये ११व्या जनरेशनचा इंटेल कोर आय ३, आय ५ आणि आय ७ प्रोसेसर मिळतो. लॅपटॉपमध्ये १६जीबी पर्यंत रॅम आणि १टीबी पर्यंत एसएसडी स्टोरेज देण्यात आली आहे. हा लॅपटॉप विंडोज ११ वर चालतो.

Tecno Megabook T1 लॅपटॉपमध्ये ७०वॉटआवरची बॅटरी देण्यात आली आहे, जी फुल चार्जमध्ये १७.५ तास चालू शकते. तसेच ६५वॉट अल्ट्रा-फास्ट चार्जरच्या मदतीनं चार्ज करता येतो. तसेच लॅपटॉपमध्ये व्हीसी कूलिंग सिस्टम पण देण्यात आली आहे. ह्याचे वजन १.५६ किलोग्राम आहे.

वाचा: iPhone 15 दुबईत ४६ हजार रुपयांनी स्वस्त! मग Make in India चा फायदा काय? नेटीजन्सचा सवाल

टेक्नो लॅपटॉपची किंमत

टेक्नो मेगाबुक टी१ लॅपटॉपची किंमत खरी प्रारंभिक किंमत ३९,९९९ रुपये आहे, परंतु लाँच ऑफर अंतर्गत हा लॅपटॉप ३७,९९९ रुपयांमध्ये विकत घेता येईल. ह्या लॅपटॉपची विक्री १९ सप्टेंबरपासून सुरु होईल.

टेक्नो कॅमोन २० प्रीमियर ५जी

जुलैमध्ये कंपनीनं टेक्नो कॅमोन २० प्रिमीयर ५जी ३० हजारांच्या बजेटमध्ये लाँच केला होता. ज्यात अ‍ॅमोलेड स्क्रीन आणि मीडियाटेक डायमेंसीटी ८०५० चिपसेट आहे. जोडीला ८जीबी रॅम सह ५१२जीबी पर्यंत स्टोरेज मिळते. फोनमध्ये १०८मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड, ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. फोनमध्ये ४५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५०००एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.