Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

OnePlus 12R 5G लवकरच होणार लाँच, लीक झाले फीचर्स

20

नवी दिल्ली : OnePlus कंपनीने आपल्या पुढील मिड-रेंज स्मार्टफोनची तयारी सुरू केली आहे. OnePlus 11R 5G भारतात फेब्रुवारी २०२३ मध्ये लाँच झाला होता. आता कंपनी OnePlus 12R वर काम करत आहे. OnePlus 12R स्मार्टफोन OnePlus 11R 5G चा अपग्रेड प्रकार असणार आहे. OnePlus 12R स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स इंटरनेटवर लीक झाले आहेत. पण आतापर्यंत OnePlus ने आगामी फोनबद्दल कोणतीही नेमकी माहिती दिलेली नाही.

टिपस्टर योगेश ब्रार (@heyitsyogesh) ने सोशल मीडिया साइट X (Twitter) वर आगामी OnePlus 12R ची लाँच टाइमलाइन आणि फीचर्स पोस्ट केली आहेत. या माहितीनुसार हँडसेट २०२४ च्या सुरुवातीला लाँच केला जाईल. माहितीनुसार, नवीन OnePlus 12R हँडसेट कंपनीच्या OnePlus Ace 3 चे रीब्रँडेड व्हर्जन असेल. OnePlus 11R 5G चीनमध्ये OnePlus Ace 2 नावाने लाँच करण्यात आला होता.

OnePlus 12R चे फीचर्स लीक
लीकनुसार, Android 14 आधारित OxygenOS 14 OnePlus 12R मध्ये उपलब्ध असेल. हँडसेटमध्ये ६.७ इंच AMOLED डिस्प्ले असू शकतो जो 1.5K रिझोल्यूशन ऑफर करेल. स्क्रीन 120 Hz रिफ्रेश रेटसह येईल. Qualcomm Snapdragon 8 Gen प्रोसेसर हँडसेटमध्ये उपलब्ध असेल. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर, हँडसेटमध्ये ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप असेल. स्मार्टफोनला ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सह ५० मेगापिक्सलचा प्रायमरी रेअर सेन्सर दिला जाऊ शकतो. या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड-अँगल सेन्सर, ३२ मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा असेल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये १६ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा असण्याची अपेक्षा आहे.
OnePlus 12R मध्ये अलर्ट स्लायडर आणि स्टिरीओ स्पीकर्स असतील. टिपस्टरचे म्हणणे आहे की फोनमध्ये 5500mAh बॅटरी आणि 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल.

वाचा : iPhone 15 मध्ये नवीन काय? ‘हे’ आहेत ५ महत्त्वाचे अपडेट्स

वाचा : Apple चं शक्तिप्रदर्शन! मजबूत टायटेनियम फ्रेमसह iPhone 15 Pro आणि iPhone 15 Max लाँच

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.