Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

महाराष्ट्र भर सध्या सुरू असलेल्या 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हा (?) बाबत टीका टिपण्णीची पत्रकार राहुल निकम यांनी मांडलेला चौफेर आढावा

19

पारोळा (प्रतिनिधी ):- महाराष्ट्र भर सध्या सुरू असलेल्या 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हा (?) बाबत टीका टिपण्णीची पत्रकार राहुल निकम यांनी मांडलेला चौफेर आढावा*बोध चिन्हाच संमेलन, अमळनेर इथे होणाऱ्य 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह जाहीर झाल आणि ज्यांनी त्यांनी त्यांच्या परीने बोध घेण्यास सुरू केले. कुणी आगपाखड तर समर्थन अगदी बोधचिन्हाची मागची अर्थे बेअर्थे वैचारिक भूमिका मांडणाऱ्या फौजा सोशल मीडिया वर उतरल्या. साहित्य संमेलन च्या बोधचिन्ह(?) अनावरण कार्यक्रमानंतर खरतर या बोध चिन्ह कशाला म्हणतात याची व्याख्याच जणू बदलललेली दिसते. आता यावर कोण काय मत मांडत यावर त्याचा मागचा वैचारिक पगडा कोणता असा ढोबळ ठपका लावून मोकळे होणाऱ्य मेंढ्या चा कळप दोन्ही बाजूने भरभरून आहे। म्हणून मत मांडताना हे स्पष्ट करू इच्छितो की गेल्या 12 वर्षापासून क्रिएटिव्ह क्षेत्रात काम करीत असताना लोगो, पोस्टर आर्ट, डिजिटल आर्ट याबद्दल थोडीफार माहिती ठेवतो. झेनलॉजिक्स सॉफ्टवेअर, MSME भारत सरकार, टाइम्स ऑफ इंडिया – क्रिएटिव्ह अँड डिजिटल या सारख्या फर्म सोबत काम करताना कारकिर्दीत अनेक मोबाईल अप्लिकेशन डिजाईन केलेत, लोगो डिजाईन केलेत, सोशल मीडिया क्रिएटिव्ह कॅम्पेन केलेत, लिम्का बुक रेकॉर्ड झालेत असे आऊटडोर इनसाईड एअरपोर्ट इंनोवेशन केलेत जवळपास 500 च्या वर ब्रँड्स हाताखालून गेलेत, आणि सध्या याच अनुभवावरून स्वतःच namami270.com म्हणून याच क्षेत्रात फर्म सुरू केलं। हे विशेष लिहिण्याच कारण अस की मत हे त्याचं अनुभवातुन मांडत आहे. यासाठी “समर्थनार्थ आणि विरोधात फक्त लिहा रे” करणारी झुंडीतील मी मेंढी नाही. माझ्या मतेहे कोणत्याही प्रकारे बोधचिन्ह नाही. विषयाला अनुसरून चित्रांची (ज्या गुगलवर सहजरित्या मिळतात) सजावट करून बनवलेले एक पोस्टर आर्ट या प्रकारात हे मोडत. बोधचिन्ह हे अतिशय कमी शब्दात खूप काही व्यक्त होण्याची कला आहे. बोधचिन्ह हे प्रतिकात्मक स्वरूपात असत जे लेटर हेड, असेंट टी शर्ट कॉफी मग वेबसाईट या छोट्या प्लॅटफॉर्मवर देखील स्पष्ट दिसावं। यासाठी विशेष कल्पकता वापरून मेहनत यात घ्यावी लागते. सध्याच्या पोस्टर आर्ट वर सरळ सरळ श्री सखाराम महाराज मंदिर चित्र व श्री मंगळग्रह संस्थानाचा अधिकृत बोधचिन्ह वापरण्यात आलं आहे जणू मंगळग्रह संस्थान या सम्मेलनाचा प्रायोजक आहे (आता लोगो काय असतो हे मंगल ग्रह संस्थान कडून नक्कीच शिकता येईल). केळीची पान, बहिणाबाई यांचं जात, या वेकटर आर्ट किंवा सिम्बॉलीक पद्धतीने मांडता आले असते परंतु जे गुगलवर सहजरित्या फोटो मिळवून जबरदस्ती ने गुंतवून एक मोर किंवा रांगोळी काढावी अश्या पद्धतीने मांडणी करून सजावट करण्यात आल्याचे दिसते. सदर पोस्टर आर्ट लेटर हेड , वेबसाईट, किंवा कोणत्याही लहान फॉरमॅट मध्ये प्रिंट करणे दिसण्यास बरे वाटणार नाही.सध्याच्या काळात क्रिएटिव्ह क्षेत्र हे इतक्या पुढे जाऊन ठेपले असताना हे बोधचिन्ह च्या नावाखाली मिळावं हे पचण्यासारखं नाहीच परंतु हे उत्तम पोस्टर आर्ट होऊ शकत. विरोध करणारा एक वीशिष्ट्य वर्ग सातत्याने टीका करीत असलं तरी कला , आर्ट, क्रिएटिव्ह क्षेत्रात काम करणाऱ्या निष्पक्ष कलाकार मध्येही याबाबत निराशा दिसून येते. हे कटू सत्य आहे। आपण पोस्टर आर्ट बोधचिन्ह म्हणून प्रकाशित केलाय हे आयोजक आणि निवड समिती पर्यवेक्षक यांनी मान्य करून कुटतरी लिहून ठेवायला हवे. याची दुसरी बाजू। तूर्तास या पोस्टर आर्ट ला बोधचिन्ह यासाठी म्हणूया की त्याचे आता अनावरण झालाय… या लढाया बघता खर तर लक्षात येत की बोधचिन्ह बनविताना श्री आर्टिस्ट यांनी त्यांच्या विरोध आणि समर्थन जे काही विचार मंथन करीत आहे, लोक भरभरून लिहीत आहे यांच्या एवढा तरी विचार केला असावा का ? तर यात त्याची काहीही चुकी नाही. त्यांच्या मेहनतीचा कल्पकतेचा आदर करायला हवा, एक आर्टिस्ट आणि माझ्या समक्षेत्रात असणाऱ्या प्रत्येकाचा मी आदर करीत असतो. टोकाची मत मांडणे हे परिहार्य वाटत नाही. त्यांनी फक्त त्यांची जबाबदारी पार पाडली आहे.”खान्देशी संस्कृती” दर्शवणाची अट असताना सहभागी स्पर्धक त्याच विषयावर निश्चितच लक्ष केंद्रित करणार. संमेलन होणाऱ्या ठिकाण लक्षात घेता परिसरातील प्रसिद्ध, ओळख, संस्कृती दर्शविणाऱ्या सर्व गोष्टी बोधचिन्हात समाविष्ट करण्यात आलाय. त्याचबरोबर बोधचिन्ह बनवणारे देखील खान्देशी असल्याचे कळते त्यामुळे त्यांनि बोधचिन्हात काय वापरावे हे त्यांना इतरांपेक्षा कणभर जास्तच माहीत असावं हे मात्र निश्चित. त्यांचा तो प्रामाणिक प्रयत्न. त्यांनी घेतलेली धार्मिक गोष्टी यावर अनेकांचा आक्षेप असला तरी फक्त त्यामुळे विरोध करणे चुकीचे आहे त्या केळीची पाने , जात, धार्मिक स्थळे ही आमची खान्देशी संस्कृतीच आहे. आणि ती दाखवण्यात गैर नाही. तथाकथित्यांच्यात पोटशूळ उठण्याचे कारण नसावे. त्यापलीकडे,मंडळाने बोधचिन्हासाठी सर्वांना आवाहन केले होते. जे अगदी सर्वांसाठी खुले होते. बोधचिन्हचा विषय देखील सार्वजनिक रित्या जाहीर होता. त्याप्रमाणे त्यांच्या आकलन नुसार, माहितीनुसार कल्पकतेनुसार अनेकांनी बोधचिन्ह बनवून ते मंडळास सुपूर्द केले. यासारखे अनेक बोधचिन्ह निवड समितीला मिळाले असतील यात दुमत नाही आणि आलेल्या बोधचिन्हापैकीच सध्याचे असणारा मंडळाने अंतिम ठरवले असावे.खर तर किती स्पर्धक यात सहभागी झालेले किती बोधचिन्ह समितीस मिळाले , हे बोधचिन्ह निवडण्यासाठी काय निकष लावले गेले किंवा पोस्टर आर्ट ला बोधचिन्ह म्हणून घेण्याची वेळ का आली, हे सर्व निवड समिती ने अधिकृत फेसबुक वर जाहीर केले तर हा गुंता सुटेल. बोधचिन्ह निवड समिती ही याच क्षेत्राची जाण असणारी होती का ? देखील कुतूहलाच विषय आहे.-आता शेवटी हेच करूया.साहित्य संमेलनचा खरा उद्दिष्ट हा फक्त बोधचिन्ह बनवणे नसून त्यापलीकडे देशभरातील मराठी साहित्यिक यांचा मेळावा भरविणे , साहित्य महर्षी यांचे मार्गदर्शन, पुस्तके खरेदी, असे अनेक उपक्रम छान रित्या पार पडायचे आहे त्यात कुठलं गालबोट लागू नये ही सर्वांनी काळजी घेणं खान्देश वासियाना आवश्यक आहे. हा कार्यक्रम कसा उत्तम यशस्वी होईल आणि खान्देश चे नाव सर्वदूर कस उंचावेल यासाठी प्रयत्न करूया. यासाठी आयोजक मंडळाने खान्देशातील इतर ही गुणवत्तेचा वापर करून घ्यावा. सहभागी करून घ्यावे.याचसाठी , सध्याच् पोस्टर आर्ट देखील “बोधचिन्ह” म्हणून मान्य कराव लागलं तरी आनंद आहे. श्री राहुल साहेबराव निकम9028190150

Leave A Reply

Your email address will not be published.