Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात ‘या’ पदांची भरती; आजच करा अर्ज

9

Shivaji University Kolhapur Post Doctoral Fellow Recruitment 2023: तुम्ही जर पदवीधर असाल आणि पीएचडी पर्यंतचे शिक्षण झाले असेल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात चालून आली आहे. या विद्यापीठाच्या अंतर्गत ‘पोस्ट डॉक्टरल फेलो या पदाच्या एकूण ०५ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नुकतीच शिवाजी विद्यापीठाने याबाबत अधिसूचना जाहीर केली आहे.

या पदांकरिता/ फेलोशिपकरिता इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून ०६ नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, वेतन, अर्ज प्रक्रिया याची सविस्तर माहिती घेऊया.

‘शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर भरती २०२३’ मधील पद आणि पदसंख्या:
पोस्ट डॉक्टरल फेलो – ०५ जागा (विविध विषयातील)
एकूण रिक्त पदसंख्या – ०५ जागा

शैक्षणिक पात्रता: अर्जदार उमेदवार शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून संबधित विषयात पीएचडी / डॉक्टरेट असणे आवश्यक आहे. तसेच यूजीसी मान्यताप्राप्त जर्नलमध्ये उमेदवाराचे रिसर्च पेपर प्रकाशित झालेले असावे.
(या व्यतिरिक्त सविस्तर पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली दिलेली आहे.)

(वाचा: RailTel Recruitment 2023: ‘रेलटेल कॉर्पोरेशन इंडिया’ मध्ये ‘या’ पदांसाठी भरती; पगारही आहे भरपूर)

नोकरीचे ठिकाण: कोल्हापूर

फेलोशिप रक्कम: ३० हजार मासिक

अर्ज पद्धती: ऑनलाईन

निवड प्रक्रिया: मुलाखतीद्वारे

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०६ नोव्हेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरतीसंदर्भात अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरतीकरिता थेट अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. अर्ज शेवटच्या तारखे नंतर म्हणजे ०६ नोव्हेंबर नंतर आल्यास ग्राह्य धरला जाणार नाही. यातून पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखती करिता कोणताही प्रवासी किंवा निवासी भत्ता दिला जाणार नाही.

(वाचा: BOM Recruitment 2023: बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये पदवीधरांसाठी मोठी भरती; आजच करा अर्ज)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.