Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

ऑफिसच्या कामांचे उत्तम नियोजन करण्यासाठी ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा

11

Work Management Tips: हल्ली प्रत्येकाला आपल्या कामाची चिंता सतावत असते. आजचा दिवस संपला तरी उद्याचे काय हा प्रश्न असतोच. नोकरीवर आपला चरितार्थ असल्याने प्रत्येकजण तिथे चिकाटीने काम करत असतो. पण बर्‍याचदा काम अधिक असेल तर त्याचा ताण जाणवू लागतो. कधीकधी कार्यालयीन वेळ उलटून गेली तरी काम आटोपत नाही. अधिकाचा वेळ काढून काम पूर्ण करावे लागते, अशाने काम नकोसे वाटू लागते.

पण या गोष्टी टाळताही येऊ शकतात. काम सोपे करण्यासाठी आवश्यक असते ते कामाचे नियोजन. खूप काम एकत्र आले की त्याचे नियोजन करणे राहून जाते. पण नियोजनपूर्वक आणि शिस्तबद्ध पद्धतीने कामा केले तर ते सहज आणि वेळेत पूर्ण होऊ शकते. त्यासाठी काही खास गोष्टी आपल्याला आंगीकाराव्या लागतील. त्यासाठीच ऑफिसच्या कामाचे नियोजन कसे करावे हे जाणून घेऊया.

कामाची आखणी करा: ऑफिसमध्ये तुमचे कामाचे स्वरूप ठरलेले असेल, त्यानुसार तुम्हाला काही टार्गेट देखील असतील तर त्याची आधी आखणी करा.आपल्यापुढे किती काम आहे आणि ते कसे पूर्ण करायचे याचा एक कृती आराखडा तयार करा. विशिष्ट पद्धतीने ठरवून काम केले तर टार्गेट पूर्ण करता येते.

कामाचा क्रम ठरवा: खूप कामे अंगावर असतील तर आधी त्याचा क्रम ठरवता याला हवा. आपल्या वरिष्ठांशी चर्चा करून कोणत्या कामाला किती महत्व द्यायचे आणि कोणते काम आधी पूर्ण करायचे हे निश्चित करा. कामाचा क्रम ठरवला तर कामे हातवेगळी करणे सोपे होते आणि कामाला अधिक गती येते.

(वाचा: Job Resigning Tips: नोकरीचा राजीनामा देण्याचा विचार करताय? मग त्याआधी ‘या’ टिप्स नक्की वाचा)

वेळेचे नियोजन: आपल्या हातात किती वेळ आहे आणि काम किती आहे कळल्यानंतर वेळा ठरवून घ्या. एखादे विशिष्ट काम एखाद्या वेळेतच पूर्ण करण्याचे टार्गेट ठेवा. तसेच कुठे वेळ वाचवता येईल याचा विचार करून त्यानुसार कामे करा. वेळेचे गणित साधले तर कोणतेही काम पूर्ण करता येते.

फोनवर बोलणे टाळा: अनेकदा कामात असतानाही कामा व्यतिरिक्त अनेक फोन कॉल आणि मेसेज आपल्याला येत असतात. अशावेळी त्यांना महत्व न देता कामासाठी वेळ द्यायला हवा. आपण बाहेरच्या कॉल आणि मेसेजला प्राधान्य दिले तर त्यात आपला बराच वेळ निघून जातो आणि कामे अर्धवट राहतात.

कामाचा अतिरिक्त भार आल्यास: कामाचा अचानक अतिरिक्त भार आल्यास त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करा. ते काम किती आहे, किती वेळात पूर्ण करता येईल याचा अंदाज घ्या. काम तुमच्याकडून शक्य होणार नसेल तर सहकार्‍यांची मदत घ्या, त्या संदर्भात वरिष्ठांशी चर्चा करून त्याचे नियोजन करा.त्या कामाची तातडी लक्षात घेऊन त्याचा प्राधान्यक्रम ठरवायला हवा.

नोंदवही करा: आपल्या कामाची नोंदवही आपल्याकडे हवी. आज कोणते काम करायचे आहे, ते किती वेळात करायचे आहे. त्यासाठीच्या सूचना काय आहेत, ऐनवेळी काही बदल झाले आहे का आणि अन्य अनेक लहानमोठ्या नोंदी या वहीमध्ये किंवा डायरीमध्ये करून ठेवा. अशा नोंदी ठेवल्यास आपल्याला कामाचे, वेळेचे स्मरण राहते. घाई गडबडीत काही विसरलोच तर त्याची आठवण करून देण्यासाठी अशी नोंदवही उपयोगी ठरते.

(वाचा: BOM Recruitment 2023: बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये पदवीधरांसाठी मोठी भरती; आजच करा अर्ज)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.