Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आज ‘ग्रहण’ आहे… पण, ‘खग्रास’ की ‘खंडग्रास’ खगोल शास्त्रज्ञ’ करतात याचा अभ्यास

10

Career As Astronomer: खगोल शास्त्र हे जगातील सर्वात जुने पण तेवढेच प्रभावी शास्त्र आहे. या शास्त्रात पृथ्वीच्या अंतरंगातील खनिज, लाव्हा यांच्यासह पृष्ठभागावरील नद्या, पर्वत सजीवसृष्टी, सूर्य, चंद्र, आकाशगंगा, उल्का, ग्रहांची स्थिती त्यांचे नियम, त्यांच्या परिक्रमांची दिशा, त्यामागचा इतिहास व भविष्यातील त्यांच्या हालचाली या सर्व घटकांचा अभ्यास खगोल शास्त्रज्ञ करतात. पण, खगोल शास्त्रज्ञ बनायचे असल्यास काय करावे

खगोलशास्‍त्राशी संबंधित इतर शाखा :

एके काळी भौतिकशास्‍त्राचीच एक महत्त्वाची शाखा असलेले खगोलशास्त्र हे एक स्वतंत्र शास्‍त्र म्हणून जगाच्या समोर आली. त्यानंतर त्याचे विविध शाखांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यात एस्ट्रोफिजिक्स, एस्ट्ररोमेटेओरोलॉजी, एस्ट्ररोबायोलॉजी, एस्ट्ररोजियोलॉजी, एस्ट्ररोमेट्री व कास्मोलॉजी अशा विविध शाखांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्व शाखा मिळून आपआपल्या पद्धतीने अवकाशातील रहस्यांचा अभ्यास करतात.

खगोलशास्त्रज्ञांची वाढती मागणी :

ज्या तरुणांना अवकाशातील रहस्ये जाणून ज्ञायची आणि त्यात करिअर घडवण्याचे स्वप्न पाहतात त्यांना या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. खगोलशास्त्रज्ञांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. या क्षेत्रात करियर करणार्‍यांना भौतिकशास्त्रात रूची असणे आवश्यक आहे. खगोलशास्त्र एक व्यापक क्षेत्र आहे. या शास्‍त्रांच्या विविध शाखा असून युवकांना त्यांच्या आवडीनुसार शाखा निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. खगोलशास्त्रात करीयर करणारे विद्यार्थी ही या क्षेत्रात राहून आपले उज्ज्वल भविष्य घडवू शकतात.

तुमच्यात ही कौशल्ये असणे गरजेचे :

  • खगोलशास्‍त्रज्ञ होण्यासाठी प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता, जिद्द व चिकाटी आवश्यक आहे.
  • बुद्धिमत्ता, कल्पनाशीलता, समस्यांशी संघर्ष या कौशल्याने विद्यार्थी निपुण असला पाहिजे.
  • शिवाय,या क्षेत्रात करिअर विद्यार्थी गणित व संगणक शास्त्रातील किडा असणे गरजेचे आहे.
  • या क्षेत्रात कमी वेळेत जास्त व अचूक काम केले जाते. त्यामुळे वेळेचे बंधन पाळणे आणि वेळेत काम पूर्ण करण्याची तुम्हाला सवय असणे गरजेचे आहे.
  • उत्तम बुद्धिमत्तेसोबत विद्यार्थ्यांमध्ये मार्गदर्शकाकडून सांगितले जाणारा विषय त्वरीत आकलन करून त्यावर क्रिया करता येणे आवश्यक आहे.

काम कठीण आणि आव्हानात्मक :

एस्ट्रानॉमरचे मुख्य कार्य संशोधनावर आधारित असते. त्यामुळे त्याला सतत फिरावे लागते. त्यांचे काम हे निरिक्षण करणे व उपग्रहापासून मिळणारे सांकेतिक संदेश प्राप्‍त करून संबंधित वेधशाळेला पाठवणे शिवाय त्याच अभ्यास करणे हे त्यांचे मुख्य काम असते. तसेच उपग्रहाच्या कम्युनिकेशनमध्ये काही अडथळा निर्माण झाला असेल तर तो दुरूस्त करणे हेही त्यांचा विविध कामांपैकी महत्त्वाचे काम आहे.

पीएचडी करणार्‍या विद्यार्थ्यांनाही करता येते काम :

  • पीएचडी होल्डर त्यांच्या करियरला ‘पोस्टडाक्टरेट रिसर्च’पासून आरंभ करतात. त्याचबरोबर विषयांच्या अभ्यासाच्या आधारावर ते ‘ऑब्जर्वेशनल एस्ट्रानॉम’, ‘स्टेलर एस्ट्रोनॉमर्स’ व ‘सोलर एस्ट्रोनॉमर्स’ या पदावर ही काम करू शकतात.
  • पीएचडी करणारे युवक कॉलेज अथवा विद्यापीठात शिक्षण घेत असताना ‘बेसीक रिसर्च डेव्हलपमेंट’मध्ये करियर करू शकतात.
  • पदवीधर विद्यार्थी ‘एप्लाइड सिर्च व डेव्हलपमेंट’ या महत्त्वपूर्ण क्षेत्रात करीयर घडवू शकतात.
  • या क्षेत्रात बॅचलर डिग्री धारण करणारा विद्यार्थी ‘टेक्नीशियन’, ‘रिसर्च असिस्टेट’ म्हणून करियरला सुरवात करू शकतो.
  • या क्षेत्रात काम करणार्‍यांना सरकारी कार्यालये, संरक्षण मंत्रालय, अवकाश संशोधन संस्था आदी सरकारी विभागात सहज नोकरी मिळू शकते.

पात्रता महत्त्वाची :

– ‘खगोलशास्त्रज्ञ’ होण्यासाठी डाक्टरेट डिग्री आवश्यक असते. कारण याचा संबंध संशोधन व विकास विभागाशी असतो.

– ज्या विद्यार्थ्यांला यात प्रवेश घ्यायचा असेल तो PCM विषयांच्या ग्रुपसह १२ वी उत्तीर्ण पाहिजे.
थिओरिटिकल अथवा ऑब्जर्वेशनल एस्ट्रोनॉमीमध्ये करीयर करण्यासाठी बारावीत विज्ञान शाखेमधून शिक्षण झालेले असणे गरजेचे आहे.

– बारावी उत्तीर्ण केल्यानंतर गणित व भौतिकशास्त्रात पदवी घेऊ शकतात.

– तसेच, याच विषयांमध्ये मास्टर डिग्री केल्यानंतर एस्ट्रोनॉमीमध्ये स्पेशलाइजेशनपासून तर पीएचडी करता येऊ शकते.

– पीएचडी केल्यानंतर अवकाश शास्त्रज्ञ, अंतराळवीर, एस्ट्रोफिजिसिस्ट किंवा अंतराळ वैज्ञानिक तसेच संशोधन अधिकारी होण्याचा मार्ग खुला होतो.

– रिसर्च करण्यासाठी पीएचडी अनिवार्य असून प्रविष्ट विद्यार्थ्यांना ज्वाइंट एंन्ट्रस् स्क्रीनिंग टेस्ट देणे आवश्यक आहे.

– इस्ट्रूमेंटेशन व एक्सपेरिमेंटल एस्ट्रोनॉमीमध्ये करियर करण्यासाठी इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल कम्युनिकेशनमध्ये बीई अथवा बीटेक केल्यानंतर या क्षेत्रासह रिसर्च क्लॉलरमध्ये प्रवेश घेता येऊ शकतो.

भारतातील प्रमुख संस्थांची नावे :

1. आर्यभट्ट रिसर्च इंस्टिट्युट ऑफ ऑब्जर्वेशनल सायंसेस, मनोरा पार्क नैनिताल.
2. हरिश्चचंद्र रिसर्च इंस्टिट्युट, अलाहाबाद.
3. इंडियन इंस्टिट्युट ऑफ एस्ट्रोफिजिक्स, बंगळूर
4. इंडियन इंस्टिट्युट ऑफ जियोमेग्नेटिज्म, नवी मुंबई
5. इंटर यूनिवसिर्टी सेंटर फॉर एस्ट्रोनॉमी अँड एस्ट्रोफिजिक्स, पुणे
6. नॅशनल सेंटर फॉर रेडियो एस्ट्रोफिजिक्स, पुणे
7. उस्मानिया यूनिवर्सिटी, हैद्राबाद
8. फिजिकल रिसर्च लॅब्रोटरी, अहमदाबाद
9. स्वामी रामतीर्थ मराठवाडा युनिवर्सिटी, नांदेड
10. इंडियन इंस्टिट्युट ऑफ सायंस, बंगळूर

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.