Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

दहावी पास उमेदवारांसाठी टपाल जीवन विमा, मुंबई येथे कमिशन तत्वावर नोकरी

9

Postal Life Insurance Mumbai Recruitment 2023: दहावी पास उमेदवारांसाठी ‘भारतीय डाक’ च्या टपाल जीवन विमा विभागात नोकरीची उत्तम संधी आहे. विमा विभागाच्या जीपीओ मुंबई येथे ( Postal Life Insurance) ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती अंतर्गत ‘अभिकर्ता’ पदाच्या अनेक रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

‘टपाल जीवन विमा’ यांच्या मुंबई विभागाने नुकतीच याबाबत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखती पद्धतीने निवड केली जाणार आहे. या मुलाखती ०३ आणि ०४ नोव्हेंबर रोजी होणार आहेत. तेव्हा या पदांसाठीची पात्रता, वेतन, मुलाखतीचे तपशील आणि इतर सविस्तर माहिती जाणून घेऊया.

पदाचे नाव: अभिकर्ता

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

नोकरी ठिकाण: मुंबई

(वाचा: Panvel Mahanagarpalika Bharti 2023: पनवेल महानगरपालिकेत विविध पदांची भरती; जाणून घ्या पदे, पात्रता आणि वेतन)

वयोमर्यादा: कमीत कमी १८ वर्षे कमाल वयोमर्यादेची अट नाही

निवड प्रक्रिया: मुलाखतीद्वारे

वेतन: ‘अभिकर्ता’ पदावर निवडल्या जाणार्‍या उमेदवारांना पोस्टाने वेळोवेळी ठरवून दिल्याप्रमाणे कमिशन/भत्ता दिला जाईल. या पदासाठी नोकरीप्रमाणे वेतन नाही.

मुलाखतीचा पत्ता: उपनिदेशक, डाक जीवन विमा, तळ मजला, मुख्य टपाल कार्यालय, जुनी इमारत, मुंबई ४००००१

मुलाखतीची तारीख: ०३ आणि ०४ नोव्हेंबर २०२३ (सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत)

या भरतीसंदर्भात ‘भारतीय टपाल विभागा’ची अधिकृत वेबसाइट संकेतस्थळ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भात सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

निवड प्रक्रिया: वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत प्रक्रिये द्वारे होणार आहे. उमेदवारांनी संबंधित तारखेला म्हणजे ०३ आणि ०४ नोव्हेंबर २०२३ रोजी मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे. पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहणे गरजेचे आहे. कागदपत्रे जाहिरातीत नमूद केलेली आहेत. या मुलाखतीतून निवडलेल्या उमेदवारांना परवाना परीक्षा देणे गरजेचे आहे. परवाना परीक्षे नंतर त्यांना कामकाजाचे प्रशिक्षण दिले जाईल. उमेदवारांना तात्पुरता परवाना मिळवण्यासाठी ५० रुपये तर परीक्षेसाठी ४०० रुपये शुल्क भरावे लागेल.

(वाचा: Maha Metro Recruitment 2023: महाराष्ट्र मेट्रोमध्ये अप्रेंटीस पदासाठी मोठी भरती; आजच करा अर्ज)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.