Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

२०२४ च्या जेईई मेन परीक्षेच्या रजिस्ट्रेशनला लवकरच सुरुवात; अभ्यासक्रमात बदल केला बदल एनटीएची घोषणा

10

JEE Main 2024 Updates: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) या आठवड्यात सत्र १ साठी संयुक्त प्रवेश परीक्षेसाठी म्हणजेच JEE Main 2024 अर्जाच्या तारखा जाहीर करेल. त्याचवेळी, जेईई मेनचा अभ्यासक्रमही काही बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जेईई मेन अभ्यासक्रम २०२४ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय अनेक बोर्डांच्या सूचनांनंतर घेण्यात आला आहे.

गेल्या ३ वर्षांत CBSE, NCERT तसेच अनेक राज्य मंडळांनी ९वी ते १२वीचा अभ्यासक्रम कमी केला आहे, पण JEE Main अभ्यासक्रमात कोणताही बदल केलेला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एनटीएने सर्व राज्य मंडळांशी याबाबत चर्चा केली असून, यासाथी तज्ज्ञ समिती लवकरच जेईई मेन नवीन अभ्यासक्रम आणेल अशी अपेक्षा आहे. मात्र, याबाबत कोणतेही अधिकृत अपडेट जाहीर करण्यात आलेले नाही.

(वाचा : National Testing Agency ने जाहीर केले २०२४ मधील परीक्षांचे वेळापत्रक, यादिवशी होणार CUET, NEET, JEE आणि UGC परीक्षा)

NTA ने जाहिर केलेल्या परीक्षेच्या वेळापत्रकानुसार JEE Main सत्र १ ची परीक्षा २४ जानेवारी ते १ फेब्रुवारी आणि सत्र २ ची परीक्षा १ एप्रिल ते १५ एप्रिल २०२४ या कालावधीत घेतली जाणार आहे. जेईई मुख्य अर्जाची लिंक लवकरच अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic वर सक्रिय केली जाईल. त्यानंतर इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतील. अर्जाची पायरी अधिकृत वेबसाइटवर दिली जाईल.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एनटीएचे महासंचालक सुबोध कुमार सिंह म्हणाले की, एनटीए सर्व शिक्षण मंडळांशी चर्चा करत आहे आणि या संदर्भात तज्ज्ञांची समिती सध्या या चर्चेवर आणि मतांवर आधारित अभ्यासक्रमाला अंतिम रूप देण्याच्या प्रक्रियेत आहे. सुधारित अभ्यासक्रम माहिती बुलेटिनसह लवकरच सूचित केला जाईल. त्यामुळे, अभ्यासक्रमातील दुरुस्ती अथवा बदलांची माहिती अर्जासोबतच प्रसिद्ध केली जाईल, असे मानले जात आहे.

(वाचा : JEE Main 2024: जेईई मेन २०२४ साठी अर्ज प्रक्रिया केव्हा सुरू होणार? परीक्षेची तारीख आणि इतर तपशील जाणून घ्या)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.