Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पुढील वर्षापासून CUET मध्ये मोठे बदल होणार, विषय निवडीच्या संख्येवर मर्यादा येणार; काय आहे नवीन निर्णय

6

CUET Important Updates: २०२४ च्या प्रमुख परीक्षांमध्ये काही महत्त्वाचे बदल पाहायला मिळणार आहेत. कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट म्हणजेच CUET 2024 मध्ये, विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी दिलेल्या विषयांचे पर्याय निवडण्याच्या संख्येवर मर्यादा येणार आहे. CUET-2024 मध्ये विद्यार्थ्यांना ५ ते ६ विषय निवडण्याचा पर्याय असेल. त्यामुळे आता विद्यार्थी अर्जामध्ये केवळ आवश्यक विषयच भरतील. परिणामी, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ला देखील पूर्वीपेक्षा कमी शिफ्ट्स आयोजित कराव्या लागतील.

विषयांच्या निवडीवर मर्यादा आल्यामुळे परीक्षा फार काळ चालणार नाही, निकाल वेळेवर लावण्याची योजनाही यामुळे यशस्वी होईल. २०२२ मध्ये, विद्यार्थ्यांना ९ विषयांसाठी परीक्षा देण्याचा पर्याय देण्यात आला होता आणि २०२३ मध्ये ही संख्या १० पर्यंत वाढवण्यात आली होती. परंतु प्रत्येकी १० विषयांच्या परीक्षेचा पर्याय देऊन उपयोग नसल्यामुळे परीक्षा संस्थेवर अनावश्यक दबाव वाढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

यासोबतच, संयुक्त प्रवेश परीक्षा JEE-MAINS 2024 च्या अभ्यासक्रमातही कपात केली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. देशातील सर्वात मोठी परीक्षा म्हणजे NEET-UG या वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रमही तज्ञ पाहत आहेत. त्यानुसार, पुढील वर्षीच्या परीक्षेच्या अभ्यासक्रमात काही बदल पाहायला मिळणार आहेत.

(वाचा : JEE Main 2024: जेईईच्या अभ्यासक्रमांमध्ये बदल; पुढील आठवड्यापासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात)

सर्व शाळा मंडळांच्या विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी या मुद्द्यालाही विशेष महत्त्व दिले जात आहे. एनटीएने देशातील विविध शाळा मंडळांशीही चर्चा केली आहे. याशिवाय विद्यापीठांशीही चर्चा झाली आहे.

करिअर समुपदेशक आलोक बन्सल म्हणतात की, “महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याला आवश्यक असलेले जास्तीत जास्त गुण ५ ते ६ विषयांच्या परीक्षेत बसून मिळवता येतात. त्यामुळे तो विज्ञान विषयांसाठी परीक्षा देतो पण जर एखाद्या विज्ञानाच्या विद्यार्थ्याला वाणिज्य विषय निवडायचा असेल तर तो ६ विषय निवडू शकतो.

यामुळे, विद्यार्थ्यांना समान संधी मिळणार का?

शिक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, CUET सह इतर प्रवेश परीक्षांचा अभ्यासक्रम सर्व बोर्डांच्या विद्यार्थ्यांना समान संधी मिळतील अशा प्रकारे तयार केला जाणार आहे. CUET मधील अभ्यासक्रम बारावीच्या स्तरावरील विषयाच्या सामान्य आकलनावर आधारित असेल. याचा फायदा फक्त एकाच बोर्डाच्या विद्यार्थ्यांना होईल असे होणार नाही.

CUET चा अभ्यासक्रम CBSE बरोबरच सर्व शाळा मंडळांच्या विद्यार्थ्यांना लक्षात घेऊन तयार केला जाणार आहे. यावेळीही ही परीक्षा संगणकावर आधारित चाचणी (Computer Based Test) असेल आणि यात केवळ वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातील. ही चाचणी १५ मेपासून सुरू होईल आणि ३१ मे २०२४ पर्यंत चालेल.

शिवाय, अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी JEE-Mains अभ्यासक्रम कमी करण्याचा उद्देश सर्व बोर्डांच्या विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध करून देणे हा आहे. कोणत्याही शाळेच्या बोर्डात एखादा विषय शिकवला जात नसेल तर तो अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येणार नाही.

(वाचा : National Testing Agency ने जाहीर केले २०२४ मधील परीक्षांचे वेळापत्रक, यादिवशी होणार CUET, NEET, JEE आणि UGC परीक्षा)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.