Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नोकरीमध्ये पहिल्याच मुलाखतीत सिलेक्ट व्हायचंय? मग ‘या’ ५ टिप्स नक्की फॉलो करा

9

Job Interview Tips: तुम्ही नोकरीमध्ये फ्रेशर असाल किंवा अनुभवी तरीही प्रत्येक नव्या नोकरीच्या आधी मुलाखतीला जाताना दडपण हे येतेच. त्यात जर तुमची पहिलीची नोकरी असेल तर या मुलाखतीची अधिकच भीती वाटते. कारण मुलाखत चांगली झाली नाही तर नोकरी हातातून जाऊ शकते. त्यामुळे नोकरीच्या दृष्टीने हा सर्वाधिक महत्वाचा टप्पा असतो. म्हणूनच मुलाखत अशी व्हायला हवी की पाहिल्याच वेळी तुम्हाला त्यांचे मन जिंकता यायल हवे, म्हणजे नोकरी मिळणे सोपे होते. पण त्यासाठी नेमके काय करायचे हे आज जाणून घेऊया.

अभ्यास महत्वाचा: मुलाखतीआधी जिथे जातो आहोत त्या जागेचा, कंपनीचा, तिथल्या कामाचा अभ्यास करून ठेवा. तिथली खासियत, तिथे जाण्यामागचा उद्देश याची माहिती असायला हवी. स्वतः विषयी देखील सर्व गोष्टी अचूक आणि खर्‍या सांगता याला हव्या. तुम्हाला ज्या कामासाठी निवडले जात आहे, त्यावरही अभ्यास असणे गरजेचे आहे. जेणेकरून तुमची कितपत तयारी आहे, हे मुलाखतीमध्ये तपासले जाऊ शकते. त्यामुळे त्या कंपनी विषयी, तिथल्या कामा विषयी आणि स्वतः विषयी अभ्यास करून जाणे आवश्यक आहे.

(वाचा: UGC News: उच्च शिक्षण संस्थांसाठी ‘यूजीसी’चा मोठा निर्णय; शुल्क, सुविधा यासह सर्व माहिती संकेतस्थळावर देणे बंधनकारक)

माहिती खरी द्या: तुमच्या परिचय पत्रात/ रेज्युमे मध्ये दिलेली माहिती खरी असायला हवी. त्यांना जर संशय आला आणि त्याच्याशी निगडीत प्रश्न केले तर आपल्या माहितीत सत्यता हवी. तसेच मुलाखतीमध्ये जे काही विचारेल त्याची खरी उत्तरेच द्यावीत. कारण त्यातून तुमचा आत्मविश्वास अधिक स्पष्टपणे दिसून येतो शिवाय अशावेळी तुम्ही विश्वास संपादन करता.

आत्मविश्वासाने बोला: मुलाखतीसाठी संवाद कौशल्यच असायला हवे असे काही नाही. तुम्हाला जे बोलायचे आहे, जे मांडायचे आहे ते आत्मविश्वासाने मांडा. कोणतीही गोष्ट सांगताना शांतपणे सांगा. अडखळून, गोंधळून जाऊ नका. काही चुकलेच तर मध्ये थांबा आणि पुन्हा बोलायला सुरूवात करा. तुम्ही आत्मविश्वासाने मुलाखतीला सामोरे गेलात तर समोरच्यावर सहज छाप पडते.

या गोष्टी चुकवू नका: मुलाखतीच्या दिवशी अर्धा तास आधी तुम्ही तिथे हजर असायला हवे. तुमचे कपडे स्वच्छ, नेटके आणि त्या नोकरीला साजेसे असे हवे. अती रंगीत, भडक आणि बटबटीत कपडे टाळावे. आपली देहबोली व्यवस्थित असावी कसे बसावे, कसे उठावे, कसे बोलावे याची आपल्याला कल्पना असावी. मुलाखतीच्या वेळी हातांची चुळबुळ, पाय हलवणे, सतत डोक्याला हात लावणे असे प्रकार टाळावे.

ऐकण्याची तयारी ठेवा: मुलाखतीला गेल्यानंतर केवळ आपण बोलायचे नसते. समोरची व्यक्ती काय सांगत आहे हे बारकाईने ऐकून त्यांचे म्हणणे समजून घ्यायचे असते. ते काही महत्वाचे बोलत असतील तर त्यांना चुकूनही मध्ये तोडू नका किंवा अडवू नका. समोरच्याचे शांतपणे ऐकून घेतल्यावरच आपले मत मांडा. तसेच जुन्या नोकरी विषयी वाईट बोलणे टाळा.

(वाचा: Tips for English Learning: इंग्रजी समजतं पण लिहिता बोलता येत नाही? मग या ५ टिप्स जरूर वाचा)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.