Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

करिअर मध्ये यशस्वी होण्यासाठी कम्युनिकेशन स्किल कमी पडतय? मग ‘या’ टिप्स फॉलो करा

8

‘कम्युनिकेशन स्किल’ म्हणजे संवाद किंवा संभाषण कौशल्य या विषयाला सध्या अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. किंबहुना मुलांच्या करिअरमधील संवादाचे महत्व लक्षात घेऊन आपल्याकडे अभ्यासक्रमात देखील या विषयाचा समावेश केला आहे. कारण उत्तम संवादाशिवाय काहीच शक्य नाही. तुम्ही शाळेत जा, बाजारात जा, कामावर जा किंवा जगाच्या पाठीवर कुठेही भटकंतीसाठी जा संवादा शिवाय तुम्हाला कोणताही पर्याय सापडणार नाही.

तुम्ही उत्तम संवाद साधू शकला तर तुम्ही चटकन समोरच्याचे मन जिंकून घेता. आणि हाच संवाद करिअरच्या दृष्टीने देखील महत्वाचा ठरतो. आजकाल प्रभावी संप्रेषण हे कॉर्पोरेट मधील मोठे साधन बनले आहे. आपले म्हणणे दुसर्‍या व्यक्ती पर्यंत पोहोचवणे आणि त्याची सहमती मिळवणे यावर अनेक व्यवहार चालत असतात. म्हणूनच हल्ली नोकरीसाठी येणार्‍या उमेदवाराचे संवाद कौशल्यही तपासले जाते. तेव्हा जाणून घेऊया ‘संवाद कौशल्य’ कसे आत्मसात करावे.

श्रोत व्हा: तुम्ही किती चांगले बोलता, तुम्ही किती मोठे वक्ते आहात यापेक्षा तुम्ही श्रोते आहात का हे पहिल्यांदा तपासून घ्या. कारण आपले म्हणणे ऐकवण्या आधी समोरच्याचे म्हणणे शांत पणे ऐकून घेता याला हवे. उत्तम संवादाची ही पहिली पायरी आहे. तुम्ही जर समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून, ते समजून घेतले तर त्याचा विश्वास संपादन करता येतो. यानंतर जर तुम्ही बोललता तर त्याचा वेगळा प्रभाव पडतो.

(वाच: SBI Recruitment 2023: स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ‘या’ पदांसाठी भरती; जाणून घ्या पदे, पात्रता, वेतन)

आदर करा: आपण कोणत्याही क्षेत्रातील कोणतेही मोठी अधिकारी असलो तरी आपल्या समोर येणार्‍या व्यक्तीचा आदर करायला शिका. शक्यतो समवयस्क किंवा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तींचा एकेरी उल्लेख टाळा. समोरची व्यक्ती अधिकाराने, वयाने मोठी असेल तर त्याची अनुमती घेऊन संवाद साधा. याशिवाय कोणत्याही संवादात एकमेकांच्या मताचा आदर करणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे.

शांतपणे बोला: बर्‍याचदा कार्यालयात एखादे मत मांडताना, सहकार्‍यांशी किंवा वरिष्ठांशी बोलताना आपल्या आवाजाची पातळी वाढते. एखादे मत नाही पटले तर त्यावर आपण थेट विरोध करतो किंवा आपली दहबोली बिघडते. पण असे करणे प्रकर्षाने टाळा. करिअर मध्ये तुम्हाला कोणतीही गोष्ट शांततेत हाताळता याला हवी. आपले म्हणणे प्रेमाने आणि पुरावे देऊन पटवता यायला हवे. चर्चेतून मार्ग काढायला हवा. एकमेकांशी संयमाने आणि आदराने बोलणे म्हणजेच संवाद कौशल्य होय.

काय बोलायचे हे निश्चित हवे: काममध्ये आपण घरात बोलल्या प्रमाणे वाटेल ते आणि वाटेल तसे बोलून चालत नाही. तिथे बोलताना आधी काय बोलायचे हे ठरवून घ्यायला हवे. मीटिंग असेल तर तुमचे मुद्दे आणि मांडणी तयार हवी. कुणाचे प्रश्न आले तर त्यावर उत्तरे तयार हवीत. तुमच्या संभाषणाला एक रूपरेषा हवी. तुमच्या संवादाल दिशा आणि ध्येय असायला हवे.

कुठे थांबायचे हे कळले पाहिजे: आपल्याला बोलण्याची संधी दिली म्हणजे आपण कितीही आणि कसेही बोलत सुटलो असे वर्तन टाळावे. मुद्देसूत आणि नेटके बोलावे. शिवाय आपल्याला कुठे थांबायचे हे कळले पाहिजे, मग तो संवाद असो किंवा चर्चा. तसेच समोरच्याचा गोंधळ उडणार नाही इतके आपले बोलणे स्पष्ट आणि मोजके हवे.

(वाचा: Maha RERA Recruitment 2023: ‘महाराष्ट्र रेरा’ मध्ये १२वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी; आजच करा अर्ज)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.