Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

जेईई मेन २०२४ च्या अभ्यासक्रमात महत्त्वाचे बदल; गणित, भौतिकशस्त्र आणि रसायनशास्त्र विषयांमधून अनेक Topics काढून टाकले

12

JEE Main 2024: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने १ नोव्हेंबर २०२३ रोजी संयुक्त प्रवेश परीक्षा म्हणजेच Joint Entrance Examination (JEE) MAIN 2024 संदर्भात अधिसूचना प्रकाशित केली आहे. National Testing Agency ने JEE Main 204 साठी नोंदणी करण्याबाबत नोटीस देखील जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, इच्छुक आणि पात्र उमेदवार ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत अर्ज करू शकणार आहेत. या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या पायर्‍या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आल्या आहेत.

JEE Main 2024 सत्र १ परीक्षा २४ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. जेईई मेन २०२४ चे सत्र २ ची परीक्षा १ एप्रिल ते १५ एप्रिल २०२४ दरम्यान पार पडणार आहे. JEE Main 2024 सर्व तपशील अधिकृत वेबसाइट www.nta.ac.in/Engineeringexam वर देण्यात आला आहे.

JEE परीक्षेच्या अर्जाचा फॉर्म ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करून एका महिन्याच्या आत सबमिट करावा लागेल. त्यानंतर उमेदवारांना शहराच्या माहितीचा तपशील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर परीक्षेच्या तीन दिवस आधी अधिकृत वेबसाइटवर प्रवेशपत्र जारी केले जाईल.

त्याचवेळी, २०२४ साठी जेईई मुख्य प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम एनटीएने कमी केला आहे. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि गणित विषयातील बहुतांश टॉपिक जेईई मेन २०२४ च्या अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात आले आहेत.

(वाचा : JEE Main 2024: जेईई मेन २०२४ चा अभ्यासक्रम जाहीर झाला, परीक्षा पॅटर्न आणि इतर महत्त्वाचा तपशीलही वेबसाइटवर उपलब्ध)

गणित विषयातून हे Topic काढून टाकण्यात आले (List of topics removed from Mathematics) :

  • Mathematical Inductions
  • Mathematical Reasoning
  • A few topics were removed from Three Dimensional Geometry.

भौतिकशास्त्र विषयातून हे Topic काढून टाकण्यात आले (List of topics removed from Physics) :

  • Communication Systems
  • A few topics were removed from the Experimental Skills.

रसायनशास्त्रातून हे Topic काढून टाकण्यात आले (List of topics removed from Chemistry) :

  • Physical quantities and their measurements in Chemistry, precision, and accuracy, significant figures
  • States of Matter
  • Thomson and Rutherford’s atomic models and their limitations
  • Surface Chemistry
  • s-Block Elements
  • General Principles and Processes of Isolation of Metals
  • Hydrogen
  • Environmental Chemistry
  • Polymers
  • Chemistry in Everyday Life

जेईई मुख्य परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना आयआयटी, एनआयटी, ट्रिपलआयटीसह इतर महाविद्यालयांमध्ये बीटेक कोर्सेसमध्ये प्रवेश दिला जातो. याशिवाय अनेक राज्यांतील महाविद्यालये आणि विद्यापीठेही या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रवेश देतात.

(वाचा : National Testing Agency ने जाहीर केले २०२४ मधील परीक्षांचे वेळापत्रक, यादिवशी होणार CUET, NEET, JEE आणि UGC परीक्षा)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.