Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
कारण आज आरोग्य व्यवस्थेत या क्षेत्राला विशेष स्थान आहे. शिवाय या क्षेत्रात प्रचंड संधी उपलब्ध झालेल्या आहेत आणि पगारही भरपूर दिला जात आहे. त्यामुळे रुग्ण सेवेची आवड असेल तर नर्सिंग सारखा सर्वोत्तम पर्याय दूसरा नाही. यामध्येही अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत. तेव्हा ‘नर्सिंग’ विषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.
नर्सिंग: मोजक्या शब्दात सांगायचे तर रुग्णसेवेला ‘नर्सिंग’ असे म्हणतात. यामध्ये मराठीत महिला कर्मचारी असतील तर त्यांना परिचारिका आणि पुरुष कर्मचारी असतील तर त्यांना परिचर असे म्हणतात. रुग्णांना प्राथमिक उपचार करणे, इंजेक्शन, औषधे देणे, ड्रेसिंग, फिजिओथेरपी, डॉक्टरांच्या अनुपस्थितीत रुग्णाची काळजी घेणे अशी अनेक कामे नर्सिंग मध्ये येतात. एवढेच नाही तर सध्या त्यांच्या कामात अनेक बदल झाले असून वैद्यकीय क्षेत्रातील अनेक नवीन गोष्टी त्यांना शिकवल्या जात आहेत.
अभ्यासक्रमाविषयी:
- परिचारिका किंवा परिचर बनण्याची इच्छा असेल तर त्यामध्ये प्रामुख्याने तीन कोर्सेस आहेत. ज्यामध्ये एएनएम, जीएनएम आणि बीएससी नर्सिंग या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
- ‘एएनएम’ म्हणजे ऑक्झिलरी नर्स मिडवाइफ/हेल्थ वर्कर कोर्स. जो नर्सिंगचा डिप्लोमा म्हणून ओळखला जातो. या पदविका अभ्यासक्रमाचा कालावधी दीड ते दोन वर्षांचा असून हा बारावी नंतर करता येऊ शकतो.
- ‘जीएनएम’ म्हणजे ‘जनरल नर्स मिडवाइफरी’ कोर्स. या साडेतीन वर्षांचा अभ्यासक्रम आहे. यासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र विषय घेऊन विज्ञान शाखेटतून १२वी परीक्षा किमान ४० टक्के गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- बीएससी नर्सिंग म्हणजे यामध्ये नर्सिंग क्षेत्रातील पदवी तुम्हाला प्राप्त होते. हा चार वर्षांचा पूर्णवेळ अभ्यासक्रम आहे. यासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयासह विज्ञान शाखेतून किमान ४५ टक्क्यांनी बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
(वाचा: BEL Recruitment 2023: इंजिनियर्ससाठी सुवर्णसंधी! भारत इलेक्ट्रोनिक्स मध्ये मोठी भरती)
अभ्यासक्रमांचे शुल्क: नर्सिंग हा अभ्यासक्रम अनेक सरकारी महाविद्यालयांमध्ये उपलब्ध असल्याने त्याचा शिक्षणाचा खर्च हा प्रत्येक संस्थेवर अवलंबून आहे. सरकारी महाविद्यालये आणि सरकारी अनुदानित महाविद्यालये यामध्ये खासगी संस्थांपेक्षा तुलनेने अत्यंत माफक शुल्क आकारले जाते. परंतु खासगी वैद्यकीय शिक्षण संस्था अंदाजे ४० हजार ते १ लाख ८० हजारपर्यंत वार्षिक शुल्क आकारतात.
नोकरीच्या संधी: सध्याचे वातावरण आणि रोगराईचे प्रमाण पाहता या क्षेत्रात प्रचंड मोठ्या संधी आहे. करोना काळात या सगळ्याचे महत्व आपण जाणलेच. त्यामुळे नर्सिंग हे अनेक मोठ्या संधींनी भरलेले क्षेत्र आहे. ज्यामध्ये सरकारी, निम सरकारी किंवा खासगी रुग्णालये, नर्सिंग होम यामध्ये तुम्ही नोकरी करू शकता. याशिवाय सरकारी आस्थापना, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, आरोग्य गृह अशा ठिकाणीही परिचर आणि परिचारिका यांना उत्तम संधी असते. सध्या या क्षेत्रात वेतनही भरपूर दिले जात आहे. एवढेच नव्हे तर परदेशातही संधी उपलब्ध आहेत.
काही गैरसमज: अनेकांना नर्सिंग म्हणजे केवळ मुलीच हा कोर्स करू शकतात असे वाटते. पण हा कोर्स मुली आणि मुले दोघांसाठीही आहे. या क्षेत्रात मुलांनाही मोठ्या प्रमाणात संधी आहेत. शिवाय कला किंवा वाणिज्य शाखेतील विद्यार्थी नर्सिंग करू शकत नाहीत असेही बोलले जाते. परंतु या शाखांमधील विद्यार्थी देखील नर्सिंगला प्रवेश घेऊ शकतात. त्यांना ‘एएनएम’ करून नर्सिंग क्षेत्रात येता येते.
(वाचा: WRD Jalsampada Vibhag Bharti 2023: जलसंपदा विभागात ४ हजार ४९७ पदांची महाभरती; ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख)