Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ, मुंबई येथे विविध पदांची भरती; आजच करा अर्ज

12

Maharashtra Animal and Fishery Sciences University Recruitment 2023: मुंबईकरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ, मुंबई अंतर्गत भरती सुरू आहे. या भरतीच्या माध्यमातून यंग प्रोफेशनल, वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि शास्त्रज्ञ या पदांच्या एकूण ०३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नुकतीच याबाबत विद्यापीठाने अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे.

या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखत पद्धतीने निवड केली जाणार आहे. या मुलाखती १७ नोव्हेंबर २०२३ रोजी होणार आहेत. पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहण्याचे आवाहन विद्यापीठाने केले आहे. तेव्हा या भरती मधील पदे, पात्रता, वेतन आणि मुलाखत प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती पाहूया.
(फोटो सौजन्य: महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ, मुंबई)

‘महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ, मुंबई भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
यंग प्रोफेशनल – ०१ जागा
वरिष्ठ शास्त्रज्ञ – ०१ जागा
वैज्ञानिक – ०१ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०३ जागा

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार भिन्न असून त्याचे तपशील अधिसूचनेत नमूद केले आहेत. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.

(वाचा: MMRCL Recruitment 2023: ‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन’ मध्ये विविध पदांची भरती, आजच अर्ज करा)

वेतन:
यंग प्रोफेशनल – ३५ हजार
वरिष्ठ शास्त्रज्ञ – ५९ हजार ६०० आणि इतर भत्ते
शास्त्रज्ञ – ५७ हजार ७०० आणि इतर भत्ते

नोकरी ठिकाण: मुंबई

निवड प्रक्रिया: मुलाखतीद्वारे

मुलाखतीचा पत्ता: मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई-४०० ०१२

मुलाखतीची तारीख: १७ नोव्हेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ, मुंबई भरती २०२३’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भात ‘वरिष्ठ शास्त्रज्ञ’ आणि ‘शास्त्रज्ञ’ या पदांच्या अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भात ‘यंग फ्रोफेशनल’ या पदाची अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मुलाखत प्रक्रिया: या भरतीकरिता थेट मुलाखत पद्धतीने निवड होणार आहे. मुलाखतीस येताना अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक ती कागदपत्रे सोबत आणावी. मुलाखतीला येण्याआधी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे. मुलाखतीस १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते १० याच वेळेत उपस्थित राहणे गरजेचे आहे. त्यानंतर आलेल्या उमेदवारांना ग्राह्य धरले जाणार नाही.

(वाचा: Career In BCA: कम्प्युटरची आवड आहे? मग ‘बीसीए’ मध्ये करा करिअर; भविष्य बदलेल..)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.