Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मुंबई महानगरपालिकेत ‘या’ पदांसाठी भरती; जाणून घ्या पदे, पात्रता आणि वेतन

9

मुंबई महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या आरोग्य विभागाद्वारे भरती प्रक्रिया राबवाण्यात आली आह. या भरतीच्या माध्यमातून ‘आहारतज्ञ’ या पदाच्या एकूण १० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नुकतीच मुंबई महानगर पालिकेने याबाबत अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे.

या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज ऑनलाईन म्हणजेच ई-मेल पद्धतीने करायचा असून १२ नोव्हेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन आणि अर्जप्रक्रिया याची सविस्तर माहिती पाहूया.
(फोटोसौजन्य – विकिपीडिया)

‘बृहन्मुंबई महानगरपालिका आरोग्य विभाग भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
आहारतज्ञ – १० जागा
एकूण रिक्त पदसंख्या – १० जागा

शैक्षणिक पात्रता: उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून आहारतज्ज्ञ विषयातील बीएससी पदवी प्राप्त असावा. तसेच Nutrition and Dietetics या विषयात पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.

(वाचा: Tips For History Study: इतिहास शिकताना तारखा लक्षात ठेवणं कठीण जातय? मग ‘या’ सोप्या टिप्स एकदा वाचाच)

वेतन: प्रतिभेट १०० रुपये. रुग्ण अधिक असले तरी दिवसातून जास्तीत जास्त १२०० रुपये मानधन दिले जाईल. महिन्यातील २५ दिवस भेटीचे असतील.

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती: ऑनलाईन (ई-मेल द्वारे)

अर्ज करण्यासाठी ई-मेल पत्ता: NCDCELL2022@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख: १२ नोव्हेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘बृहन्मुंबई महानगरपालिका’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भात अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑनलाइन म्हणजेच ईमेल पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच १२ नोव्हेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक ती सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडावी. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

(वाचा: LTMGH Hospital Bharti 2023: मुंबईच्या सायन हॉस्पिटल मध्ये ‘या’ पदांची भरती; जाणून घ्या पदे, पात्रता आणि वेतन)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.