Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठी भरती; जाणून घ्या पदे, पात्रता आणि वेतन

11

NHM Sindhudurg Recruitment 2023: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी आणि जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून मोठी भरती सुरू आहे. या भरती अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, सुपर स्पेशालिस्ट, विशेषज्ञ, दंत वैद्यकीय अधिकारी, फिजिओथेरपिस्ट, डेटा एन्ट्री ऑपरेटर, पॅरामेडिकल वर्कर, स्टाफ नर्स या आणि अशा अनेक पदांच्या एकूण ८१ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

याबाबत नुकतीच सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने अधिसूचना जाहीर केली आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून २८ नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरती प्रक्रियेतील पदे, पात्रता, वेतन याची सविस्तर माहिती पाहूया.

‘राष्ट्रीय आरोग्य अभियान, सिंधुदुर्ग भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
वैद्यकीय अधिकारी (PG) आयुष – ०१ जागा
वैद्यकीय अधिकारी (MBBS) – १८ जागा
सुपर स्पेशालिस्ट – ०३ जागा
स्पेशालिस्ट – ३३ जागा
दंत वैद्यकीय अधिकारी – ०१ जागा
कार्यक्रम व्यवस्थापक/ सार्वजनिक आरोग्य – ०६ जागा
सुविधा व्यवस्थापक – ०१ जागा
फिजिओथेरपिस्ट – ०२ जागा
टीबी पर्यवेक्षक – ०३ जागा
सामाजिक कार्यकर्ता – ०१ जागा
ऑडिओलॉजिस्ट – ०१ जागा
प्रोग्राम असिस्टंट – ०२ जागा
डेटा एन्ट्री ऑपरेटर – ०१ जागा
पॅरामेडिकल वर्कर – ०१ जागा
समुपदेशक – ०१ जागा
स्टाफ नर्स – ०६ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ८१ जागा

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार भिन्न असून त्याची सविस्तर माहिती अधोसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.

(वाचा: Pune Mahanagarpalika Bharti 2023: पुणे महानगर पालिकेत पशूवैद्यकीय अधिकारी पदासाठी भरती; पगारही आहे भरपूर)

वेतन: (मासिक)
वैद्यकीय अधिकारी (PG) आयुष – ३० हजार
वैद्यकीय अधिकारी (MBBS) – ६० हजार
सुपर स्पेशालिस्ट – १ लाख २५ हजार
स्पेशालिस्ट – ७५ हजार
दंत वैद्यकीय अधिकारी – ३० हजार
कार्यक्रम व्यवस्थापक – सार्वजनिक आरोग्य – ३५ हजार
सुविधा व्यवस्थापक – १७ हजार
फिजिओथेरपिस्ट – २० हजार
टीबी पर्यवेक्षक – २० हजार
सामाजिक कार्यकर्ता – २८ हजार
ऑडिओलॉजिस्ट – २५ हजार
प्रोग्राम असिस्टंट – १८ हजार
डेटा एन्ट्री ऑपरेटर – १८ हजार
पॅरामेडिकल वर्कर – १७ हजार
समुपदेशक – २० हजार
स्टाफ नर्स – २० हजार

नोकरी ठिकाण: सिंधुदुर्ग

अर्ज शुल्क: १५० रुपये

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, मुख्य प्रीय इमारत तळमजला जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग मु.पो ओरोस, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: २८ नोव्हेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘सिंधुदुर्ग प्रशासन’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भात अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(वाचा: LTMGH Hospital Bharti 2023: मुंबईच्या सायन हॉस्पिटल मध्ये ‘या’ पदांची भरती; जाणून घ्या पदे, पात्रता आणि वेतन)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.