Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सातवी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! ईस्टर्न कोलफील्ड्स मध्ये ‘सुरक्षा रक्षक’ पदासाठी महाभरती

8

Eastern Coalfields Limited Bharti 2023: तुम्ही जर सातवी उत्तीर्ण असाल आणि एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर केंद्र सरकारच्या अंतर्गत येणार्‍या ‘ईसीएल’ म्हणजेच ‘ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड’ या कंपनीमध्ये मोठी सुवर्णसंधी आहे. या कंपनीद्वारे ‘सुरक्षा रक्षक’ पदाच्या एकूण २४४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नुकतीच याबाबत ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडने अधिसूचना जाहीर केली आहे.

या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणार्‍या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन म्हणजेच ई-मेल पद्धतीने करायचा असून २३ नोव्हेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती पाहूया.

‘ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
सुरक्षा रक्षक – २४४ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – २४४ जागा

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून ७ वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

(वाचा: CMC Chandrapur Recruitment 2023: चंद्रपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात भरती, ‘या’ पदांसाठी आजच करा अर्ज)

अर्ज पद्धती: ऑनलाइन ई-मेल द्वारे

अर्ज करण्यासाठी ई-मेल पत्ता: bhartiecl@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख: २३ नोव्हेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑनलाइन म्हणजेच ईमेल पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच २३ नोव्हेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

(वाचा: LTMGH Hospital Bharti 2023: मुंबईच्या सायन हॉस्पिटल मध्ये ‘या’ पदांची भरती; जाणून घ्या पदे, पात्रता आणि वेतन)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.