Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे येथे विविध पदांची भरती; आजच करा अर्ज

12

D. Y. Patil Vidyapeeth Recruitment 2023: पुण्यामध्ये नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. महाराष्ट्रातील प्रख्यात विद्यापीठांपैकी एक असलेल्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे येथे भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीद्वारे विविध संवर्गातील एकूण २० पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये वित्त अधिकारी, कायदा अधिकारी, सहाय्यक निबंधक, सहाय्यक प्रोग्रामर, विभाग अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक, सहाय्यक या पदांचा समावेश आहे.

नुकतीच याबाबत डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाने अधिसूचना जारी केली आहे. या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज ऑनलाइन ईमेल द्वारे तसेच ऑफलाइन पद्धतीने देखील अर्ज करायचा असून २४ नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता आणि इतर सविस्तर तपशील जाणून घेऊया.

‘डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ पुणे भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
वित्त अधिकारी – ०१ जागा
कायदा अधिकारी – ०४ जागा
सहाय्यक निबंधक – ०१ जागा
सहाय्यक प्रोग्रामर – ०१ जागा
विभाग अधिकारी – ०३ जागा
वरिष्ठ सहाय्यक – ०३ जागा
सहाय्यक – ०७ जागा
एकूण रिक्त पदे – २० जागा

(वाचा: Homework Tips For Student: गृहपाठ पूर्ण होत नाहीय? मग घरी अभ्यास करण्याच्या ‘या’ खास टिप्स नक्की वाचा)

पात्रता:
वित्त अधिकारी – कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून ५५ टक्क्यांहून अधिक गुणांसह वाणिज्य शाखेतील (Commerce) पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावी
कायदा अधिकारी – कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून ‘एलएलएम’ किंवा ‘एलएलबी’ पदवी उत्तीर्ण असावी.
सहाय्यक निबंधक – कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून ५५ टक्क्यांहून अधिक गुणांसह पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावी.
सहाय्यक प्रोग्रामर – कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून ५५ टक्क्यांहून अधिक गुणांसह अभियांत्रिकी आणि एमसीएस पदवी (B. E. (Computer) / B.E. (IT) / MCA)
विभाग अधिकारी – कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून पदवी किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावी.
वरिष्ठ सहाय्यक – कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून पदवी किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावी.
सहाय्यक – कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून पदवी किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावी.

नोकरी ठिकाण: पुणे.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (ईमेल) द्वारे आणि ऑफलाइन.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: २४ नोव्हेंबर २०२३

अर्ज करण्यासाठी ईमेल पत्ता: career@dpu.edu.in

अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवण्यासाठी पत्ता: कुलसचिव, डीवाय पाटील विद्यापीठ, संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे ४११०१८.

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ पुणे’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच २४ नोव्हेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

(वाचा: ACTREC Recruitment 2023: दहावी पास उमेदवारांसाठी टाटा हॉस्पिटलमध्ये उत्तम पगाराची नोकरी; थेट मुलाखत पद्धतीने निवड)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.