Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून ०६ डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याबाबबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.
‘आयडीबीआय बँक भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक (JAM), Grade ‘O’ ) – ८०० जागा
कार्यकारी अधिकारी (ESO – Executives – Sales and Operations) – १३०० जागा
एकूण रिक्त पदसंख्या: २१०० जागा
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून बॅचलर पधवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ही पदवी पूर्णवेळ ग्रॅज्युएशनची असावी डिप्लोमा पदवी ग्राह्य धरली जाणार आहे. या व्यतिरिक्त सविस्तर पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली आहे.
(वाचा: Weaver’s Service Centre Mumbai Bharti: मुंबई येथील विणकर सेवा केंद्रात भरती, ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख)
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
वयोमर्यादा : किमान २० वर्षे ते कमाल २५ वर्षे.
वेतन: (मासिक)
पहिल्या वर्षी : २९ हजार
दुसर्या वर्षी : ३१ हजार
अर्ज शुल्क: या भरतीकरिता १ हजार रुपये अर्ज शुल्क आहे तर राखीव प्रवर्गाला २०० रुपये अर्ज शुल्क आहे.
अर्ज पद्धती: ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: २२ नोव्हेंबर २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०६ डिसेंबर २०२३
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘आयडीबीआय बँक’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच ०६ डिसेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.
(वाचा: IIT Mandi News: शिक्षणासोबत सक्षम रोजगार देण्याचा ‘आयआयटी-मंडी’ चा प्रयत्न, ‘आयहब’ कोर्सचे विशेष यश)