Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Maharashtra Government Recruitment 2023: राज्य शासनाच्या मराठी भाषा संचालनालयात भरती; ‘हे’ उमेदवार करू शकतात अर्ज | Maharashtra Times
या भरती द्वारे कनिष्ठ ग्रंथपाल, शिपाई या पदांच्या एकूण ०३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ही भरती संभाजी नगर येथील कार्यालयासाठी होणार आहे. या पदांकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून ११ डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. . तेव्हा या भरती प्रक्रियेतील पदे, पदसंख्या, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
‘भाषा संचालनालय भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
कनिष्ठ ग्रंथपाल – ०१ जागा
शिपाई – ०२ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०३ जागा
शैक्षणिक पात्रता:
कनिष्ठ ग्रंथपाल – उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच बारावी उत्तीर्ण केलेली असावी. ग्रंथालय शास्त्र या विषयातील पदविका किंवा पदवी धारण केलेली असावी.
शिपाई – उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच दहावी परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक.
(वाचा: Job Resign Tips: नोकरीचा राजीनामा देताना ‘या’ पाच गोष्टींची काळजी घ्या; अन्यथा…)
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र
वेतन:
कनिष्ठ ग्रंथपाल – २१ हजार ७०० ते ६९ हजार १०० रुपये आणि इतर भत्ते
शिपाई – १५ हजार ते ४७ हजार ६०० रुपये आणि इतर भत्ते.
वयोमर्यादा: कमाल ४० वर्षे आणि राखीव प्रवर्गाला ४५ वर्षे
अर्ज शुल्क: या भरतीकरिता खुल्या प्रवर्गाला १००० रुपये तर राखीव प्रवर्गाला ९०० रुपये परीक्षा/ अर्ज शुल्क आहे.
अर्ज पद्धती: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: ११ डिसेंबर २०२३
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘महाराष्ट्र शासन, भाषा संचालनालय’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच ११ डिसेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.
(वाचा: PGCIL Recruitment 2023: ‘आयटीआय’ उमेदवारांसाठी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनमध्ये मोठी भरती; आजच करा अर्ज)