Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
नुकतीच याबाबत पालिकेने अधिसूचना जाहीर केली असून यासाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून ३० नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
‘नवी मुंबई महानगरपालिके अंतर्गत आरोग्य विभाग भरती २०२३’ मधील पदे:
फिजीशियन
स्त्रीरोग तज्ञ
बालरोग तज्ञ
नेत्ररोग तज्ञ
त्वचारोग तज्ञ
मानसोपचार तज्ञ
कान नाक घसा तज्ञ
(वाचा: BHEL Recruitment 2023: ‘भारत हेवी इलेक्ट्रिकल्स’ मध्ये महाभरती, ६०० हून अधिक रिक्त जागांसाठी आजच अर्ज करा)
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार संबधित विषयात एमडी/ डीएनएम/ एमएस उत्तीर्ण असावा. सविस्तर पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली आहे.
नोकरी ठिकाण: नवी मुंबई
अर्ज पद्धती: ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: आरोग्य विभाग, नवी मुंबई महानगरपालिका, मुख्यालय, सीबीडी बेलापूर
अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० नोव्हेंबर २०२३
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘नवी मुंबई महानगरपालिका’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच ३० नोव्हेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.
(वाचा: Dalmia Lions College Recruitment 2023: मुंबईच्या दालमिया लायन्स कॉलेजमध्ये भरती; जाणून घ्या पदांचे सर्व तपशील)