Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मेष राशीच्या लोकांवर बुध संक्रमणाचा शुभ प्रभाव राहील. या काळात तुम्ही इतरांवर सहज प्रभाव टाकू शकाल आणि तुमचे बोलणे खूप प्रभावशाली असेल. संक्रमण काळात, मेष राशीच्या लोकांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे आणि कुटुंबातील सदस्याला सरकारी नोकरी देखील मिळू शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात सकारात्मक परिणाम मिळतील आणि तुम्हाला अनेक खास लोकंही भेटतील.तुम्हाला धार्मिक कार्यात रस असेल तर या काळात तुम्ही धार्मिक प्रवासालाही जाऊ शकता. कौटुंबिक जीवन चांगले राहील आणि भावा-बहिणींचे पूर्ण सहकार्य मिळेल.
मिथुन राशीवर बुधाच्या राशीपरिवर्तनाचा चांगला प्रभाव
मिथुन राशीच्या लोकांवर बुध संक्रमणाचा चांगला प्रभाव पडेल. या काळात अविवाहित व्यक्तींचे लग्न होऊ शकते आणि घरात धार्मिक कार्यक्रमही होऊ शकतो. त्याचबरोबर सिंगल लोक या काळात कुणासोबत रिलेशनशिपमध्ये येऊ शकतात. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर, या काळात जोडीदारासोबतचे संबंध चांगले राहतील आणि तुम्ही त्यांना भेट म्हणून मालमत्ता खरेदी करुन देवू शकता. संशोधन क्षेत्राशी संबंधित असलेल्यांसाठी संक्रमण काळ फलदायी ठरेल. मिथुन राशीचे लोक भागीदारीत व्यवसाय करत असतील तर या काळात तुम्हाला चांगला फायदा होईल आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.
सिंह राशीवर बुधाच्या राशीपरिवर्तनाचा फलदायी प्रभाव
सिंह राशीच्या लोकांवर बुध संक्रमणाचा फलदायी प्रभाव पडेल. या काळात व्यावसायिक जीवनात चांगली प्रगती होऊ शकते आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळेल. तसेच या काळात अविवाहित व्यक्तींच्या लग्नाची तारीख निश्चित केली जाऊ शकते. बुधाच्या भ्रमणामुळे तुमची शिकण्याची क्षमता वाढेल, ज्याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल. संवाद कौशल्याच्या जोरावर वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात नातेसंबंध दृढ कराल. या काळात सिंह राशीच्या व्यक्तींना गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकेल आणि आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी ही मेहनत घ्याल.
कन्या राशीवर राशीवर बुधाच्या राशीपरिवर्तनाचा चांगला प्रभाव
कन्या राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण चांगले असणार आहे. या काळात तुम्ही सोशल नेटवर्क वाढवण्यात यशस्वी व्हाल आणि कुटुंबासोबत चांगला वेळ व्यतीत कराल. तुमच्या घरगुती जीवनाकडे पूर्ण लक्ष द्याल आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. या काळात अनेक नोकरदार लोक वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून काम करू शकतात आणि नवीन व्यवसाय सुरू करण्याची योजनाही आखू शकतात. बुध संक्रमणाच्या प्रभावामुळे मालमत्ता किंवा वाहन खरेदीची इच्छा पूर्ण होईल आणि सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. आपल्या समजूतदारपणाने सर्व समस्या सोडविण्यात यशस्वी व्हाल.
धनु राशीवर बुधाच्या राशीपरिवर्तनाचा सकारात्मक प्रभाव
बुधाचे संक्रमण धनु राशीसाठी सकारात्मक राहील. या काळात तुमची अनेक कामे पूर्ण होतील आणि कुटुंबातील सदस्यांसमवेत नवीन घर खरेदी करण्याचा आणि घराचे नूतनीकरण करण्याचा ही विचार कराल. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात समतोल राखाल, जेणेकरून प्रत्येकजण आपला वेळ देऊ शकेल. प्रॉपर्टी एजंट म्हणून काम करणाऱ्या या राशीच्या लोकांवर बुध संक्रमणाचा चांगला प्रभाव पडेल. तुमची बोलण्याची आणि संवादाची क्षमता चांगली राहील आणि तुम्ही तुमच्या संभाषणाने इतरांना प्रभावित करू शकाल. या काळात तुमचा परदेशात जाण्याचा योग दिसून येत आहे किंवा परदेशात राहणाऱ्या नातेवाईकाला भेटू शकता.
मीन राशीवर बुधाच्या राशीपरिवर्तनाचा लाभदायक प्रभाव
बुध संक्रमणाचा प्रभाव मीन राशीसाठी लाभदायक ठरेल. या काळात तुम्ही करत असलेल्या कामाचे कौतुक होईल आणि सर्वांशी तुमचे संबंध चांगले राहतील. जर तुम्ही आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येने त्रस्त असाल तर या काळात तुमची तब्येत सुधारेल आणि तुम्ही पालकांसोबत फिरायला ही जाऊ शकता. सासरच्या मंडळींचे सहकार्य लाभेल आणि जोडीदारासोबत नवीन मालमत्ता खरेदी करण्याची योजना यशस्वी होईल. या राशीचे लोक जे अविवाहित आहेत त्यांचा या कालावधीत शोध संपेल आणि ते नातेसंबंधात येऊ शकतात. बुधाचे संक्रमण आर्थिक क्षेत्राशी निगडित लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे.