Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पनवेल महानगरपालिकेत भरती; ‘या’ पदांसाठी थेट मुलाखतीतून निवड

13

Panvel Mahanagarpalika Bharti 2023 : पनवेल महानगरपालिकेमध्ये विवक्षित कामकाजासाठी शासकीय / निमशासकीय कार्यालये तसेच नागार परिषद / नगरपालिका / महानगरपालिकेच्या सेवेतील सेवानिवृत अधिकारी आणि कर्मचार्‍यांची तात्पुरत्या स्वरुपात ११ महिन्यांसाठी कंत्राटी तत्वावर करार पद्धतीने खालील अटी व शर्तीनुसार सेवा प्रपात करून घेण्यासाठी ४ डिसेंबर २०२३ रोजी थेट मुलाखत (Walk in Interview) आयोजित करण्यात आली आहे.

सदर भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे. मुलाखतीला येताना उमेदवाराने आपली मूळ कागदपत्रे, सेवा निवृत्तीचे प्रमाणपत्र, अंतिम वेतन प्रमाणपत्र, ना विभागीय चौकशी, प्रमाणपत्र व आनुषंगिक कागदपत्रे घेण स्वतः हजर राहणे आवश्यक आहे.

पदभरतीचा तपशील :

संस्था : पनवेल महानगरपालिका, तालुका पनवेल, जिल्हा रायगड

भरली जाणारी पदे : सेवानिवृत्त अधिकारी, सेवानिवृत्त लेखाधिकारी, सेवानिवृत्त लेखा परीक्षक

एकूण रिक्त पदसंख्या : २३ जागा

(वाचा : AAICLAS मध्ये सिक्युरिटी स्क्रीनरच्या ९०६ पदासाठी भरती, फ्रेशर्सही करू शकणार अर्ज; महिलांना फीमध्ये सूट)
पदनिहाय जागांचा तपशील :

सेवानिवृत्त अधिकारी : २१ जागा
सेवानिवृत्त लेखाधिकारी : १ जागा
सेवानिवृत्त लेखा परीक्षक: १ जागा

नोकरी ठिकाण : पनवेल

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

निवड प्रक्रियेविषयी :

निवड प्रक्रिया : थेट मुलाखतीच्या माध्यमातून (Walk in Interview)
मुलाखतीचा पत्ता : आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, नाट्यगृह, पनवेल
मुलाखतीची तारीख : ०४ डिसेंबर २०२३

महत्त्वाचे :

  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
  • उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
  • मुलाखतीची तारीख ०४ डिसेंबर २०२३ आहे.
  • अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

(वाचा : Ulhasnagar Managarpalika Recruitment 2023 : उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत ‘या’ पदांवर भरती सुरु; असा करा अर्ज)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.