Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘आयआयटी बॉम्बे’ येथे विविध पदांची भरती, ‘हे’ उमेदवार करू शकतात अर्ज

13

IIT Bombay Recruitment 2023: तुम्ही पदवीधर असाल आणि उत्तम नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी मुंबईमध्ये एक खास सुवर्णसंधी चालून आली आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्थ, मुंबई म्हणजेच आयआयटी बॉम्बे यांच्या अंतर्गत मुख्य अभियंता, मुख्य सुरक्षा अधिकारी, ग्रंथालय अधिकारी, कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक या पदांच्या एकूण ४२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

आयआयटी बॉम्बेने नुकतीच याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून २१ डिसेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. . तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘आयआयटी बॉम्बे भरती २०२३’ मधील पदे आणि पदसांख्या:
मुख्य अभियंता – ०१ जागा
मुख्य सुरक्षा अधिकारी – ०१ जागा
ग्रंथालय अधिकारी – ०२ जागा
कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक – ३८ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ४२ जागा

शैक्षणिक पात्रता:
मुख्य अभियंता – सिव्हिल इंजिनियरिंग मध्ये बीई/ बी टेक उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

मुख्य सुरक्षा अधिकारी – संबधित विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण आणि संबंधित कामाचा वीस वर्षांचा अनुभव आवश्यक.

ग्रंथालय अधिकारी – ग्रंथालय विज्ञान, इन्फोर्मेशन सायन्स, डॉक्युमेंटेशन सायन्स आदि विषयातील पदव्युत्तर पदवी आणि संबधित कामाचा सहा वर्षांचा अनुभव.

कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक – मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून कोणत्याही विषयातून पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (एका पदासाठी हिन्दी विषयातील पदवी आवश्यक)

(वाचा: Dalmia Lions College Recruitment 2023: मुंबईच्या दालमिया लायन्स कॉलेजमध्ये भरती; जाणून घ्या पदांचे सर्व तपशील)

वेतनश्रेणी:
मुख्य अभियंता – १ लाख ४४ हजार २०० ते २ लाख १८ हजार २००
मुख्य सुरक्षा अधिकारी – ७८ हजार ८०० ते २ लाख ९ हजार २००
ग्रंथालय अधिकारी – ५६ हजार १०० ते १ लाख ७७ हजार ५००
कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक – २१ हजार ७०० ते ६९ हजार १००

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती: ऑनलाईन

निवड प्रक्रिया: मुलाखतीद्वारे

अर्ज करण्याची शेवटची तारीख: २१ डिसेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘आयआयटी बॉम्बे’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच २१ डिसेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

(वाचा: BHEL Recruitment 2023: ‘भारत हेवी इलेक्ट्रिकल्स’ मध्ये महाभरती, ६०० हून अधिक रिक्त जागांसाठी आजच अर्ज करा)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.