Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मुंबईतील ‘एनआयआयएच’ इंस्टिट्यूट मध्ये भरती; जाणून घ्या नोकरीचे सर्व तपशील

10

National Institute Of Immunohematology Recruitment 2023: ‘आयसीएमआर’ म्हणजेच इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या अंतर्गत येणार्‍या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोहेमॅटोलॉजी’ (NIIH) येथे भरती आयोजित करण्यात आली आहे. या भरतीद्वारे ‘एसआरएफ’ पदाची रिक्त जागा भरण्यात येणार आहे. नुकतीच याबाबत संस्थेने अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे.

विज्ञान शाखेतून पदव्युत्तर पदवी केलेल्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून ०८ डिसेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता वेतन आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोहेमॅटोलॉजी भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या :
एसआरएफ – ०१ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार संबधित विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त असावा. या व्यतिरिक्त शैक्षणिक पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली आहे.
(Post Graduate Degree in Applied Biology/Biotechnology/Biochemistry/Microbiology/ Bio Informatics OR Graduate/Post Graduate Degree in Professional Course selected through a process described through any one of the following)

(वाचा: NIV Pune Recruitment 2023: पुण्यातील ‘एनआयव्ही’ इन्स्टिट्यूटमध्ये मोठी भरती, आजच करा अर्ज)

वेतन : ३५ हजार आणि अधिकचे भत्ते

नोकरी ठिकाण : मुंबई

वयोमर्यादा : कमाल ३५ वर्षे

अर्ज पद्धती : ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०८ डिसेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोहेमॅटोलॉजी’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरतीकरिता थेट अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच ०८ डिसेंबर जानेवारी आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे

(वाचा: Startup Tips: स्वतःचा ‘स्टार्टअप’ सुरू करताय? मग या सात टिप्स कधीही विसरू नका)

शैक्षणिक विश्वातील महत्त्वाच्या अपडेट्स आणि करिअरविषयी परिपूर्ण माहिती मिळवण्यासाठी आत्ताच Follow करा, Maharashtra Times Career-Education चे अधिकृत Whatsapp Channel.।

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.