Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

शासनाच्या ‘राज्य मराठी विकास संस्था’ येथे भरती; ‘हे’ उमेदवार करू शकतात अर्ज

9

Rajya Marathi Vikas Sanstha Recruitment 2023: मराठी भाषेच्या संवर्धन आणि विकासासाठी काम करणार्‍या महाराष्ट्र शासनाच्या ‘राज्य मराठी विकास संस्था’ अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीद्वारे ‘सेवानिवृत्त अधिकारी’ या पदाच्या एकूण ०२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नुकतीच याबाबत राज्य शासनाने अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे.

ही भरती निवृत्त अधिकार्‍यांसाठी आहे. म्हणजेच तुम्ही शासनाच्या सेवेतून निवृत्त झाला असाल तर तुमच्यासाठी पुन्हा एकदा शासनासोबत काम करण्याची ही संधी आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा असून ०२ डिसेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

‘राज्य मराठी विकास संस्था भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
सेवानिवृत्त अधिकारी – ०२ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार शासकीय सेवेतून कक्ष अधिकारी, अवर सचिव अथवा उपसचिव या पदावरून किंवा वरील पदांच्या समकक्ष पदांवरुन सेवानिवृत्त झालेला असावा. या व्यतिरिक्त सविस्तर तपशील वाचण्यासाठी अधिसूचना वाचावी. त्यासाठी अधिसूचनेची लिंक खाली जोडली आहे.

(वाचा: Jyotirao Phule Death Anniversary: स्त्री शिक्षणासाठी दगड धोंडे खाणार्‍या महात्मा फुलेंचा असा होता खडतर प्रवास.. )

नोकरी ठिकाण : मुंबई

अर्ज पद्धती : ऑफलाइन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था, एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय, ३, महापालिका मार्ग, धोबी तलाव, मुंबई-४००००१.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०२ डिसेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘महाराष्ट्र शासन, राज्य मराठी विकास संस्था’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिकundefined करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया : या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच ०२ डिसेंबर जानेवारी आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

(वाचा: Startup Tips: स्वतःचा ‘स्टार्टअप’ सुरू करताय? मग या सात टिप्स कधीही विसरू नका)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.