Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अहमदनगर जिल्ह्यातील आरोग्य विभागात मोठी भरती; ‘हे’ उमेदवार करू शकतात अर्ज

8

Arogya Vibhag Ahmednagar Recruitment 2023: तुम्ही वैद्यकीय शिक्षण घेतले असेल किंवा तुमचे एम.बी.बी.एस./ बी.ए.एम.एस. या शाखांतील शिक्षण झाले असेल तर अहमदनगर जिल्ह्यात तुमच्यासाठी नोकरीची उत्तम संधी चालून आली आहे. आरोग्य विभाग, अहमदनगर यांच्या अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण ७४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. याबाबत नुकतीच आरोग्य विभागाने अधिसूचना जाहीर केली आहे.

या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखत पद्धतीने निवड केली जाणार आहे. या मुलाखती ०५ डिसेंबर रोजी होणार आहेत. उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर या मुलाखतीला उपस्थित राहायचे आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पात्रता, वेतन आणि मुलाखत प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘आरोग्य विभाग अहमदनगर, भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
वैद्यकीय अधिकारी
जिल्हा परिषद अधिनस्त गट अ – ६० जागा
जिल्हा परिषद अधिनस्त गट ब – ०२ जागा
जिल्हा रुग्णालय अधिनस्त – १२ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ७४ जागा

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार एम.बी.बी.एस./ बी.ए.एम.एस./ पदव्युत्तर/ पदविका किंवा संबधित विषयात विशेषज्ज्ञ असावा.

(वाचा: AIIMS Nagpur Recruitment 2023: ‘एम्स’ नागपूर येथे मोठी भरती; जाणून घ्या पदे, पात्रता आणि वेतन)

वेतन: (मासिक)
आदिवासी व दुर्गम भागात काम करणर्‍या एम.बी.बी.एस. अर्हताधारकांना – ८० हजार रुपये आणि
इतर भागासाठी ७५ हजार रुपये.

पदव्युत्तर/ पदविका अर्हताधारक यांना आदिवासी व दुर्गम भागात ९० हजार रुपये तर इतर भागासाठी ८५ हजार रुपये.

नोकरी ठिकाण : अहमदनगर

निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे

मुलाखतीचा पत्ता : जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, अहमदनगर

मुलाखतीची तारीख : ०५ डिसेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मुलाखत प्रक्रिया: या भरतीकरिता पात्र उमेदवारांची थेट मुलाखत पद्धतीने निवड होणार आहे. मुलाखत प्रक्रिया ०५ डिसेंबर रोजी होणार आहे. उमेदवारांनी सकाळी १०.०० वाजता मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रे घेऊन उपस्थित राहायचे आहे. तसेच मुलाखतीला येण्याआधी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.

(वाचा: BMC Recruitment 2023: मुंबई महानगरपालिकेत आरोग्य विभागात तातडीची भरती; ही संधी सोडू नका)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.