Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजीमध्ये भरती, १० डिसेंबरपर्यंत करता येणार अर्ज

9

ICMR NIV Recruitment 2023 : पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आईसीएमआर- नेशनल इंस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजी (ICMR-National Institute of Virology) मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. याअंतर्गत ग्रुप बी आणि सी (Group B and C) पदांच्या एकूण ८० जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार १० डिसेंबर २०२३ पर्यंत अर्ज करु शकतात. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर माहिती मिळू शकेल. शिवाय, बातमीखाली या भारतीच्या महत्त्वाच्या लिंक्स देण्यात आल्या आहेत .

पद भरतीचा तपशील :

एकूण रिक्त पदांची संख्या : ८० जागा

तांत्रिक सहाय्यक (Technical Assistant) : ४९ जागा
तंत्रज्ञ १ (Technician 1) : ३१ जागा

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

बारावी उत्तीर्ण / पदवी / अभियांत्रिकी पदवी (Engineering Degree) / डिप्लोमा (Diploma)

(वाचा : HSL Recruitment 2023 : हिंदुस्थान शिपयार्डमध्ये विविध पदांसाठी भरती, संरक्षण मंत्रालयाअंतर्गत काम करण्याची संधी)

वयोमर्यादा :

0 आईसीएमआर- नेशनल इंस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजी (ICMR-National Institute of Virology) मधील तांत्रिक सहाय्यक पदासाठी अर्ज करणार्‍या उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा ३० वर्षे असणार आहे.
0 तर, तंत्रज्ञ पदासाठी अर्ज करणार्‍या उमेदवारचे वय जास्तीत-जास्त २८ वर्षे असावी.

अर्ज शुल्काविषयी :

  • ICMR-National Institute of Virology मधील भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ३०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.
  • तर, SC / ST / PWBD आणि महिला उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

निवड प्रक्रिया :

  • संगणक आधारित चाचणी (CBT) लेखी परीक्षा
  • दस्तऐवज पडताळणी
  • वैद्यकीय चाचणी

याप्रमाणे अर्ज करा :

  1. खलील अधिकृत वेबसाइटला भेट द्या .
  2. सूचना लिंकवर क्लिक करा.
  3. फॉर्म भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  4. फी भरा. फॉर्मची प्रिंट आउट घ्या आणि ठेवा.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज खलील दिलेल्या लिंक च्या माध्यमातून अर्ज करायचा आहे. उमेदवारांनी १० डिसेंबर २०२३ पर्यंत अर्ज करणे अनिवार्य असणार आहे. यानंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

महत्त्वाच्या लिंक्स :

आईसीएमआर- नेशनल इंस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजी (ICMR-National Institute of Virology) मधील भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आईसीएमआर- नेशनल इंस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजी (ICMR-National Institute of Virology) मधील भरतीसाठी अर्ज करण्यासाठी येथेखालील लिंक्सवर क्लिक करा.
https://niv.icmr.org.in & https://www.icmr.nic.in

आईसीएमआर- नेशनल इंस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजी (ICMR-National Institute of Virology) च्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

(वाचा : NARI Pune Bharti 2023 : नारी पुणे येथे विविध रिक्त पदांची नवीन भरती; ‘या’ बातमीमधील लिंक वर क्लिक करून करा थेट अर्ज)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.