Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये भरती; ‘हे’ उमेदवार करू शकतात अर्ज

11

Reserve Bank of India Mumbai Recruitment 2023: तुम्ही वैद्यकीय शिक्षण घेतले असेल आणि बँकेच्या आरोग्य सेवेत काम करण्याची तयारी असेल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीद्वारे ‘वैद्यकीय सल्लागार’ पदांच्या एकूण १८ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नुकतीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

या पदांनुसार इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून २२ डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या :
वैद्यकीय सल्लागार (पार्ट टाइम) – १८ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – १८ जागा

BMC Nair Hospital Recruitment 2023: मुंबई पालिकेच्या नायर हॉस्पिटलमध्ये भरती; जाणून घ्या पदे, पात्रता आणि वेतन

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून ‘एमबीबीएस’ परीक्षा उत्तीर्ण असावा. तसेच त्याला संबधित कामाचा दोन वर्षांचा अनुभव असावा.

नोकरी ठिकाण : मुंबई

अर्ज पद्धती : ऑफलाइन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई प्रादेशिक कार्यालय, शहीद भगतसिंग रोड, फोर्ट, मुंबई – ४००००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २२ डिसेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा .

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच २२ डिसेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.