Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पश्चिम रेल्वे, मुंबई येथे कलाकारांसाठी भरती; जाणून घ्या नोकरीचे सर्व तपशील

9

Western Railway Mumbai Recruitment 2023: तुम्ही जर कलाकार आहात आणि तुमच्याकडे त्या कलेचे शास्त्रोक्त शिक्षण असेल तर तुमच्यासाठी नोकरीची एक सुवर्णसंधी चालून आली आहे. पश्चिम रेल्वे, मुंबई यांच्या अंतर्गत कलाकारांसाठी विशेष भरती सुरू आहे. या भरतीमध्ये ‘स्त्री गायिका’ आणि ‘स्त्री नृत्यांगना’ या पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नुकतीच पश्चिम रेल्वेने याबाबत अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे.

या पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज प्रक्रिया ११ डिसेंबर २०२३ पासून सुरु होणार आहे, तर ०९ जानेवारी २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘पश्चिम रेल्वे, मुंबई भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या :
स्त्री गायिका – ०१ जागा
स्त्री नृत्यांगना – ०१ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०२ जागा

शैक्षणिक पात्रता :

स्त्री गायिका – उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शास्त्रीय किंवा सुगम संगीत विषयात पदवी अथवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावा.

स्त्री नृत्यांगना – उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून कोणत्याही प्रकारातील भारतीय शास्त्रीय नृत्य विषयात पदवी अथवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावा.

या व्यतिरिक्त विस्तृत तपशील अधिसूचनेत नमूद केले आहेत. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.

नोकरी ठिकाण : मुंबई

वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३० वर्षे. कमाल वयोमर्यादेत ओबीसी प्रवर्गाला ०३ वर्षांची तर एससी/ एसटी प्रवर्गाला ०५ वर्षांची सवलत देण्यात आली आहे.

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : ११ डिसेंबर २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०९ जानेवारी २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘पश्चिम रेल्वे’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया : या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच ०९ जानेवारी २०२४ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.