Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘गोवा समग्र शिक्षा अभियान’ अंतर्गत मोठी भरती; जाणून घ्या पदे, पात्रता आणि वेतन

11

Goa RMSA Recruitment 2023: राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान यांच्या अंतर्गत ‘गोवा समग्र शिक्षा अभियान’ येथे भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती द्वारे पर्यटन आणि आदरातिथ्य, आरोग्य सेवा, बँकिंग, आर्थिक सेवा आणि विमा, बांधकाम, प्लंबिंग, सौंदर्य आणि आरोग्य, इलेक्ट्रॉनिक्स अशा विविध विभागांचा समावेश आहे. यामध्ये एकूण १७ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

नुकतीच याबाबत गोवा समग्र शिक्षा यांनी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांनुसार इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखत पद्धतीने निवड होणार आहे. या मुलाखती १८ डिसेंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आलेल्या आहेत. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता आणि मुलाखत प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, गोवा भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
पर्यटन आणि आदरातिथ्य – ०७ जागा
आरोग्य सेवा – ०२ जागा
बँकिंग – ०१ जागा
आर्थिक सेवा आणि विमा – ०२ जागा
बांधकाम – ०२ जागा
सौंदर्य आणि आरोग्य – ०१ जागा
इलेक्ट्रॉनिक्स – ०३ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – १७ जागा

NHM Amravati Recruitment 2023: योग प्रशिक्षकांसाठी अमरावती जिल्हा परिषदेत मोठी भरती, जाणून घ्या नोकरीचे सर्व तपशील

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार संबधित सेवेतील विषयात पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी प्राप्त असावा. या पदांची विस्तृत माहिती अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.

नोकरी ठिकाण – गोवा

निवड प्रक्रिया – मुलाखती द्वारे

मुलाखतीचा पत्ता – शिक्षण संचालनालय, पोर्वोरिम गोवा

मुलाखतीची तारीख – १८ डिसेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘गोवा समग्र शिक्षा अभियान’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मुलाखत प्रक्रिया: मुलाखतीला येताना अधिसूचना काळजीपूर्वक वाचने गजरेचे आहे. शिवाय अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रे सोबत आणावी. मुलाखत प्रक्रिया १८ डिसेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता सुरू होईल. उमेदवारांनी त्या आधी संबधित स्थळी उपस्थित राहायचे आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.