Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आरोग्य संचालनालय, मुंबई येथे भरती; थेट मुलाखत पद्धतीने होणार निवड

13

Directorate of Medical Education & Research Mumbai Recruitment 2023: तुम्ही विधी अभ्यासक्रमातून पदवी परीक्षा उत्तीर्ण केली असेल आणि नोकरीच्या शोधात असाल तर आरोग्य संचालनालय, मुंबई येथे उत्तम संधी चालून आली आहे. संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांच्या अंतर्गत ‘विधी अधिकारी (गट-ब)’ या पदाच्या एकूण ०३ रिक्त जागा भरण्यात येणार आहे. नुकतीच याबाबत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा असून ०१ जानेवारी २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांची थेट मुलाखत पद्धतीने निवड केली जाणार आहे. तेव्हा या भरती मधील पदे, पात्रता, वेतन आणि मुलाखत प्रक्रिया याचे सविस्तर तपशील जाणून घेऊया.

‘संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या –
विधी अधिकारी (गट-ब) – -३ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०३ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाच्या कायद्याचा पदवीधर असावा व तो सनद धारक असावा. तसेच संबधित कामाचा त्याला दोन वर्षांचा अनुभव असावा. याशिवाय सविस्तर माहिती अधिसूचनेत नमूद केली असून त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.

वेतन – ४० हजार (मासिक)

नोकरी ठिकाण – मुंबई, नागपुर, औरंगाबाद

अर्ज पद्धती – ऑफलाइन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. आयुक्त, वैद्यकीय शिक्षण संशोधन, व आयुष दंत महाविद्यालय व रुग्णालय इमारत, चौथा मजला सेंट जॉर्जस रुग्णालय आवार, पी. डीमेलो रोड, मुंबई – ४००००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०१ जानेवारी २०२४

निवड प्रक्रिया – मुलाखती द्वारे

मुलाखतीचा पत्ता –
मा. आयुक्त कार्यालय, वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष, मुंबई

मुलाखतीची तारीख आणि वेळ – १० जानेवारी २०२४, सकाळी ११ वाजता.

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘आरोग्य संचालनालय, मुंबई’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.