Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘…अन्यथा आपले पक्षचिन्ह जमीन हडपणारा ‘पंजा’ किंवा संधीसाधू ‘घड्याळ’ तरी करावे’

7

मुंबईः ‘आपला पक्ष महाविकास आघाडी (maha vikas aghadi) सरकारमध्ये सत्ताभोगत मग्न असल्यापासून हिंदुत्वाचा विसर पडलाय हे आम्हाला मान्यच आहे. परंतु आता आपल्याया धनुष्यबाणाचाही विसर पडलेला दिसतोय, हे पाहून वेदना होतात,’ अशी खोचक टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे (sandeep deshpande) यांनी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर (cm uddhav thackeray) केली आहे.

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक खरमरीत पत्र लिहलं आहे. या पत्रात त्यांनी दादर येथील बंद असलेल्या धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्राविषयी दखल घेण्याची मागणी या निमित्ताने संदीप देशपांडे यांनी केली आहे. त्याचबरोबर, शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

‘प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार करत बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केलीये शिवाय त्याला साजेसं पक्षचिन्हही निर्माण केले. ते म्हणजे ‘धनुष्यबाण’ महाभारत ते रामायण काळापासून धनुष्यबाण हा हिंदु धर्मातील महत्त्वाचं प्रतिक आहे,’ असं देशपांडे यांनी म्हटलं आहे.

‘दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या परिसरात चालत असेलेलं धनुर्विद्या प्रशिक्षण अनेक वर्षापासून बंदय. हे प्रशिक्षण सुरु असताना चुकीने एक बाण तत्कालीन महापौर निवास परिसरात जाऊन पडला. यात कुणालाही इजा झाली नाही. परंतु तरीही आपण हे धनुर्विद्या प्रशिक्षण बंद करण्याचा आदेश कम ‘फतवा’च काढल्याच समजतंय. शिवसेनेचं काय दुर्भाग्य व विरोधाभास म्हणावा, ज्या चिन्हावर आपण निवडून येता त्याच चिन्हामागचा असलेला विचारच आपल्याला संपवावा वाटतोय?,’ असं सवाल संदीप देशपांडे यांनी केला आहे.

या प्रशिक्षण चालवणाऱ्या संस्थेनं अनेक पदकं मिळवत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केलं आहे. या संस्थेसाठी नाही पण आपल्या पक्षाचे निवडणूक चिन्ह आणि भारतीय संस्कृतीचा ठेवा धनुर्विद्येसाठी तरी आपण आर्चरी क्लबला सरावाकरता जागा मिळवून द्यावी. अन्यथा आपले पक्षचिन्ह विसर्जीत करत जमिन हडपणारा ‘पंजा’ किंवा संधीसाधू ‘घड्याळ’ तरी करावे, असा टोला देशपांडे यांनी लगावला आहे.

संदीप देशपांडे यांच्या पत्रातील मुद्दे

  • धनुर्विद्या शिकणारे खेळाडू आज निराशेत आहेत. त्यांना सरावाला जागा नाही. आपण आमदार आणि सभागृहनेत्यांना आर्चरी क्लबसाठी पर्यायी जागा देण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे आर्चरी क्लबने स्थानिक आमदार, नगरसेविका व सभागृहनेत्या तसेच महापालिकेशी पत्रव्यवहार केला पण त्याला केराची टोपली दाखवण्यात आली. ज्या धनुर्विद्येसाठी शिवसेना पक्ष प्रमुखांचं ऐकलं जात नसेल तर शिवसेनेला आपलं पक्ष चिन्ह धनुष्यबाण ठेवण्याचा नैतिक अधिकार आहे का? का बाळासाहेबांची शिवसेना आता फक्त हवेतील बाणच मारण्यात पटाईत आहे? असा सवाल खेळाडूंच्या मनात आहे.

  • ही अवस्था जर खेळाडूंची होत असेल तर ऑलिम्पिंगमध्ये भारताला पारितोषिक कसं मिळणार? जे खेळाडूंचं प्रशिक्षण बंद पाडून खच्चीकरण करतायेत त्यांना ऑलिम्पिंगमधील खेळाडूंना ‘वर तोंड’ करून शुभेच्छा देण्याचा कोणता अधिकार आहे? ज्या प्रमाणे कॉमनवेल्थ गेम्समध्ये काँग्रेसने भ्रष्ट्राचार केला होता, कदाचित आघाडीत जाऊन शिवसेनेनेही हाच तर कॉमन मिनिमन प्रोग्राम तर आखला नाही? असा प्रश्न क्रिडा प्रेमींना आणि धनुर्विद्या चाहत्यांना पडला आहे.

  • खरंतर तेव्हाचे महापौर निवास, प्रस्तावित बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या मधील संयुक्त भिंतीची उंची वाढवून हा प्रश्न सोडवता आला असता. परंतु आपण त्याकडेही लक्ष दिले नाही. पण आता याला परवानगी दिली जावी आणि हे खेळाडूंचे प्रशिक्षण लवकरात लवकर सुरू करावे. तसेच लांब पल्ल्याच्या सरावाकरता १०० बाय ३०० मीटरचे सुरक्षित आणि पूर्णवेळ मैदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आम्ही करत आहोत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.